उमेदवारी मागणारे होते प्रचारकाळात क्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 05:00 AM2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:21+5:30

राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे.

Candidates were outside the field during the campaign | उमेदवारी मागणारे होते प्रचारकाळात क्षेत्राबाहेर

उमेदवारी मागणारे होते प्रचारकाळात क्षेत्राबाहेर

Next
ठळक मुद्देराळेगाव विधानसभा : २५ वर्षांपासून त्याच त्या उमेदवाराचा वीट

के.एस. वर्र्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी सर्व प्रयत्न करूनही अपयशी ठरलेले इच्छुक निवडणूक काळात दिसेनासे झाले होते. अपवाद वगळताच इच्छुकाचा चेहरा झळकत होता. राळेगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून १२ जणांनी मोर्चेबांधणी केली होती. मागील २५ वर्षांपासून एकखांबी तंबू राहिलेल्या नेत्याने पक्षाचे तिकीट तर आणले पण त्यांना विजय मात्र मिळविता आला नाही.
राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनी निवडणुकीची तयारी केली. मतदारसंघात लोकांशी सातत्याने संपर्क ठेवला. प्रसंगी आंदोलने केली केली. कधीतरी संधी मिळेल या आशेपोटी त्यांचे हे कार्य सुरू राहिले. पक्षाने मात्र त्यांची प्रत्येकवेळी निराशा केली.
यावेळच्या विधानसभेसाठी पक्षाकडे १२ उमेदवारांनी अर्ज केले होते. नवीन चेहरा या मतदार संघात दिला जाईल, असे वातावरण शेवटपर्यंत होते. मात्र अखेरच्या क्षणी प्रा.वसंत पुरके हे तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेण्यात यश आले नाही. तिकीट मागणाऱ्यांमधील अपवादात्मक चेहराच प्रचार करताना दिसत होता.
गत पाच वर्षात प्रा. पुरके यांच्याकडे कधी ऐकेकाळी असलेल्या एंबडवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या शक्तीशिवाय दुसरे कार्यकर्ते नव्हते, ही वस्तूस्थिती होती. ही शक्ती आणि ठेकेदारांची शक्ती वजा जाता प्रा. पुरके यांच्याकडे पुर्वी कधी सोबत असणारे जिवाभावाचे कार्यकर्ते कधीच दूर झाले होते.
सरलेल्या काळात त्यांचे सहकाºयांशी वेळोवेळी मतभेद झालेले आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम प्रा. पुरके यांना विजयापासून दूर ठेवण्यात झाला, असे सांगितले जाते.
नेत्यांच्या भूमिकेचाही फटका
कळंब तालुक्यातील प्रवीण देशमुख, राळेगावातील प्रफुल्ल मानकर यांचा गट कधी राष्ट्रवादीत, कधी काँग्रेसमध्ये असताना स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, लोकसभा, विधानसभा निवडणुकात विरोधात लढला आहे. यात अनेक कार्यकर्ते जिंकले, अनेक हरले. हरलेल्यांचा पैसा, वेळ, श्रम गेले. शस्त्रुत्व आले. नेत्यांचे रंग बदलने अनेक कार्यकर्त्यांना पटले नाही. त्यांनी स्वस्थ बसणे किंवा भाजपकडे वळणे पसंत केले. त्यामुळेच कळंबमध्ये शक्ती असूनही काँग्रेसला कमी तर भाजपला अधिक मते मिळाली आहे.

Web Title: Candidates were outside the field during the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.