ग्लायफॉसेटवर बंदीचे कारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:26 PM2019-05-11T23:26:20+5:302019-05-11T23:26:41+5:30

शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले तणनाशक ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याचे कारस्थान राज्य सरकारच्या कृषी विभागात सुरू आहे. या प्रकाराला शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे, असे माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले.

The capture of glyphosets | ग्लायफॉसेटवर बंदीचे कारस्थान

ग्लायफॉसेटवर बंदीचे कारस्थान

Next
ठळक मुद्देशेतकरी संघटना । शेती करणे बंद करावे लागेल, ४५ वर्षांपासून वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले तणनाशक ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याचे कारस्थान राज्य सरकारच्या कृषी विभागात सुरू आहे. या प्रकाराला शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे, असे माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले.
गतवर्षी अनधिकृत जीएम कापूस बियाण्यांचा वापर रोखण्यासाठी ग्लायफॉसेटवर बंदीचा विचार कृषी खात्याने केला होता. तथापि त्याला शेतकरी संघटनेने (शरद जोशी) विरोध केल्याने बंदी बारगळली. गेली ४५ वर्षे ग्लायफॉसेटचा वापर शेतीत होत आहे. त्यामुळे कोणतेही अपाय झाल्याचे उदाहरण नाही, कॅन्सर होण्याचा कोणताही पुरावा नाही, कमी खर्चात तणनियंत्रण होते. अशा परिस्थितीत ग्लायफॉसेटवर बंदी आली तर शेती पडीत ठेवण्याची पाळी येईल. म्हणून बंदीला विरोध आहे, असे चटप म्हणाले. यावेळी शेतकरी संघटनेचे विजय निवल, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कृष्णराव भोंगाडे, डॉ. विजय चापले आदी उपस्थित होते.
असंख्य पुरावे
ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होत नाही, हे सिद्ध करणारे असंख्य पुरावे, शोधनिबंध उपलब्ध आहे. काही हितसंबंधी लोकांचा दबाव व आमिषाने ग्लायफॉसेटवर बंदीची घाई कृषी विभाग करत आहे. स्वस्त तणनाशकावर बंदी घालून पर्यायी महाग, पेटंट असलेल्या तणनाशकाचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा खटाटोप असल्याचे वामनराव चटप यांनी सांगितले.

Web Title: The capture of glyphosets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती