उभ्या ट्रकवर कार आदळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 10:14 PM2019-06-02T22:14:05+5:302019-06-02T22:14:47+5:30

उमरखेड ते हदगाव मार्गावरील पटेल पेट्रोलपंपाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार आदळली. यात कारमधील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. भास्कर दत्तात्रय सुरमवाड (५३) असे मृताचे नाव आहे.

A car hit a vertical truck and killed one | उभ्या ट्रकवर कार आदळून एक ठार

उभ्या ट्रकवर कार आदळून एक ठार

Next
ठळक मुद्देउमरखेडची घटना : एक गंभीर जखमी, ढाणकीची बाजारपेठ बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
ढाणकी : उमरखेड ते हदगाव मार्गावरील पटेल पेट्रोलपंपाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार आदळली. यात कारमधील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली.
भास्कर दत्तात्रय सुरमवाड (५३) असे मृताचे नाव आहे. ते ढाणकी येथील कृषी केंद्राचे संचालक होते. भास्कर सुरमवाड कारने (एम.एच.२६/बी. ४५) औरंगाबादला गेले होते. रात्री परत येत असताना उमरखेड-हदगाव रोडवर उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांची कार आदळली. यात भास्कर सुरमवाड व प्रकाश देवांग हे दोघे गंभीर जखमी झाले. तर निखिल प्रकाश देवांग, प्रशांत प्रकाश देवांग व पुष्पा कड हे तिघे किरकोळ जखमी झाले. निखिल देवांग कार चालवित होते.
अपघातानंतर माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार व पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे नांदेडला रवाना केले. मात्र रस्त्यातच भास्कर सुरमवाड यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी प्रकाश देवांग यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. भास्कर सुरमवाड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ढाणकी शहर कार्यवाह होते. त्यांच्या निधनामुळे रविवारी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: A car hit a vertical truck and killed one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात