यवतमाळ जिल्ह्यातील गुरांच्या बाजारात वर्दळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 12:32 PM2020-12-09T12:32:54+5:302020-12-09T12:33:27+5:30
Yawatmal news cattle market यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रसमध्ये गुरांच्या बाजारात वर्दळ वाढली असून शेतकरी आणि गोवंश पालकांनी व व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्री करिता आणणे सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याच्या दिग्रसमध्ये गुरांच्या बाजारात वर्दळ वाढली असून शेतकरी आणि गोवंश पालकांनी व व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्री करिता आणणे सुरु केले आहे.
संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या दिग्रस येथील बैल बाजारात मागील सात महिन्या पासून शुकशुकाट पसरला होता. कोरोना प्रादुर्भाव नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे येथील बाजार बंद ठेवण्यात आला होता. परंतु आता निवळत असलेल्या परिस्थितीमुळे येथील बाजारामध्ये व्यापारी , गोवंश धारकांची आणि शेतकऱ्यांची वर्दळ वाढली असून जनावरे खरेदी विक्री करिता रेलचेल वाढली आहे. गुरांच्या बाजाराकरिता हा काळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो.