नियमांचे पालन करून भीम जयंती घरी राहूनच साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:42 AM2021-04-09T04:42:17+5:302021-04-09T04:42:17+5:30

येत्या १४ एप्रिल रोजी गर्दी व मिरवणूक करण्याऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन डॉ. बाबासाहेब ...

Celebrate Bhim Jayanti at home by following the rules | नियमांचे पालन करून भीम जयंती घरी राहूनच साजरी करा

नियमांचे पालन करून भीम जयंती घरी राहूनच साजरी करा

googlenewsNext

येत्या १४ एप्रिल रोजी गर्दी व मिरवणूक करण्याऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी महाराष्ट्र शासनाचा लॉकडाऊन कष्टकरी, कामगार लोकांवर एक प्रकारचा अन्याय असून गोरगरिबांची काहीही व्यवस्था करण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला.

खासगी दवाखान्यात लाखो रुपयांचे बिल घेऊन जनतेची पिळवणूक होत आहे. परंतु शासनाचे यावर कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळे खासगी दवाखान्यांवर बिलासाठी शासनाने निर्बंध आणावे, अन्यथा अवाढव्य बिले देऊन पिळवणूक होत असल्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र मानकर यांनी दिला. आंबेडकरी जनता संविधानाला मानणारी आहे. त्यामुळे शासनाने कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून या वर्षी ऑनलाइन पद्धतीने प्रत्येकाच्या घरावर निळा झेंडा लावून भीम जयंती साजरी करावी, असे आवाहन मानकर यांनी केले.

बॉक्स

लोकवर्गणी गरजूंना द्यावी

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गतवर्षापेक्षा या वर्षी कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे वर्गणीची रक्कम गरजू लोकांना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शासनाने कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत स्पष्ट नियमावलीचे पत्रक काढावे व त्याचे पालन सर्वांनी करण्याचे आवाहनही महेंद्र मानकर यांनी केले.

Web Title: Celebrate Bhim Jayanti at home by following the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.