सिमेंटचा ट्रक पैनगंगेत उलटला
By विलास गावंडे | Updated: December 28, 2024 23:09 IST2024-12-28T23:09:06+5:302024-12-28T23:09:18+5:30
चालक जखमी : माहूर मार्गावरील धनोडाच्या पुलावरील घटना

सिमेंटचा ट्रक पैनगंगेत उलटला
धनोडा (यवतमाळ) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिमेंटचा ट्रक धनोडा येथील पैनगंगा नदीत उलटल्याची घटना शनिवारी (दि. २८) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत चालक जखमी झाला. त्याचे नाव कळू शकले नाही.
सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक (क्र. एमएच ३४ एबी ४०२३) माहूरहून पुसदकडे निघाला होता. धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक १० ते १५ फूट खोल पुलात कोसळला.
घटना घडताच नागरिकांनी मदत कार्य सुरू केले. चालक ट्रकच्या केबिनमध्ये फसून असल्याने जेसीबी बोलाविण्यात आला. त्याद्वारे जागा तयार करून त्याला बाहेर काढून तातडीने माहूर येथे हलविण्यात आले. ट्रकमधील सिमेंटची पोती पाण्यात पडल्याने खराब झाली. दरम्यान, प्रकृती गंभीर झाल्याने चालकाला यवतमाळ येथे हलविण्यात आले.