केंद्रीय कापूस संशोधक केंद्राचे पथक पांढरकवडात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 05:00 AM2020-11-01T05:00:00+5:302020-11-01T05:00:02+5:30
अवकाळी पावसाने आधीच कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बोंडे अक्षरश: सडून गेली. हे संकट जात नाही तोच गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. त्यामुळे २७ हजार ८०० हेक्टरमधील कपाशी बाधित झाली असून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या भागात सर्वाधिक कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. येथील कपाशीला लांब धाग्याच्या कपाशीमुळे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सुरूवातीला कपाशीचे अतिशय चांगले पीक होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातील अनेक भागात कपाशीवर बोंडसड व गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. या पिकांची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक वाय.जी.प्रसाद यांनी आपल्या पथकासह पांढरकवडा येथे भेट दिली.
अवकाळी पावसाने आधीच कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बोंडे अक्षरश: सडून गेली. हे संकट जात नाही तोच गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. त्यामुळे २७ हजार ८०० हेक्टरमधील कपाशी बाधित झाली असून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या भागात सर्वाधिक कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. येथील कपाशीला लांब धाग्याच्या कपाशीमुळे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सुरूवातीला कपाशीचे अतिशय चांगले पीक होते. परंतु सप्टेंबर व ऑक्टोबरच्या सुरूवातीला झालेल्या परतीच्या पावसाने कपाशीची वाट लावली. आता बोंडसड व गुलाबी बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे उरलेसुरले पीकही वाया जाणार आहे. प्रादूर्भाव झालेल्या या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या या चमुने डोंगरगाव येथील शेतकरी मोहन मामीडवार यांच्या शेतात जाऊन पऱ्हाटीची पाहणी केली. त्यानंतर ही चमू सोनबर्डी येथे गेली व तेथील शेतकरी किसन मंदे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाची पाहणी केली. त्यानंतर खैरगाव येथील शेतकरी गजानन तोटावार व कृष्णराव देशट्टीवार यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. यावेळी वाय.जी.प्रसाद, किटकशास्त्रज्ञ डॉ.चिन्नाबाबू नाईक, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ.दीपक नगराळे, जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, कृषीभूषण ॲड.रामकृष्ण पाटील, यवतमाळ येथील कृषी अधिकारी आर.डी.पिंपळशेंडे, झरीचे तालुका कृषी अधिकारी ए.एम.बदखल, मारेगावचे तालुका कृषी अधिकारी एस.के.निकाळजे, कृषी अधिकारी ए.एम.बर्डे उपस्थित होते.