सीईओंनी चौकशी समितीचा अहवाल फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:10 PM2018-08-03T22:10:34+5:302018-08-03T22:10:57+5:30
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे १३ वने निधीतून संगणक संच खरेदीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल सीईओंनी फेटाळला आहे. आता त्यांनी फेरचौकशी समिती नेमूनर् ५ दिवसात अहवाल मागितला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे १३ वने निधीतून संगणक संच खरेदीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल सीईओंनी फेटाळला आहे. आता त्यांनी फेरचौकशी समिती नेमूनर् ५ दिवसात अहवाल मागितला आहे.
समाजकल्याण विभागातर्फे १३ वनेच्या निधीतून जिल्ह्यातील काही शाळांसाठी डिजीटल साहित्य खरेदीचा प्रस्ताव होता. प्रस्ताव मंजूर होताच जवळपास २६ शाळांमध्ये २८ संगणक संच पुरविण्यात आले. मात्र त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविली गेली नाही. यावरून स्थायी व सर्वसाधारण सभेत गदारोळ उडाल्यानंतर उपाध्यक्षांनी सदर संच एका सामाजिक संस्थेने दिल्याचा दावा केला होता. अशा सामाजिक संस्थेचा सत्कार करावा अशी भूमिका विरोधकांनी मांडली होती. त्यानंतरच्या सभेत पुन्हा वादंग झाल्याने लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमण्यात आली. या समितीने सीईओंना आपला अहवाल सादर केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी डिजीटल साहित्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल फेटाळून लावला आहे. त्यांच्या अहवालाला असहमती दर्शवून शर्मा यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याकरिता तीन अधिकाऱ्यांची फेरचौकशी गठित केली आहे.
या समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी विजय देशमुख, पंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील वनकर यांचा समावेश आहे. या समितीला १५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहे.
वंटन आदेशाचे काय?
गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उपाध्यक्षांनी साहित्य खरेदी प्रकरणी वंटन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता सीईओंनी फेरचौकशी नेमल्याने या वंटन आदेशाचे नेमके काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता साहित्य खरेदी झाले असल्याने त्याचे वंटन आता कसे काय करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.