दारव्हा येथे गर्भाशय कर्करोग तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:41 AM2021-03-10T04:41:40+5:302021-03-10T04:41:40+5:30

जगात कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाचे आणि गर्भाशयाच्या मुखावरील कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. वेळीच ...

Cervical Cancer Screening Camp at Darwha | दारव्हा येथे गर्भाशय कर्करोग तपासणी शिबिर

दारव्हा येथे गर्भाशय कर्करोग तपासणी शिबिर

Next

जगात कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाचे आणि गर्भाशयाच्या मुखावरील कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. वेळीच तपासणी करून घेतली आणि कमी प्रमाणात असतानाच जर त्यावर योग्य उपचार झालेत तर रोग पुर्णता बरा होतो. त्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी डॉ. कोमल सांगाणी आणि डॉ. ऋचा पोटफोडे यांनी शिबिरात आलेल्या महिलांच्या विविध प्रकारच्या तपासणी केल्या. शिबिरात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. शिबिराच्या आयोजनाकरीता डॉ. कांचन नरवडे, डॉ. कोमल सांगाणी, डॉ. ऋचा पोटफोडे, प्रा.अवंती राऊत, डॉ. लीना राठोड संध्या साबु, अर्चना उडाखे, माधवी नरवडे अँड.वैशाली हिरे, पद्मा मेश्राम, सुनिता शेंदुरकर, रिता भोंडे, आशा डोंगरे, वंदना जाधव, रेश्मा डोईफोडे, सुशीला देशपांडे, कोकीळा राऊत, रंजना वानखेडे, मंजु सागर, चैताली मुटकुळे, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Cervical Cancer Screening Camp at Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.