सराफ व्यापाऱ्यांचे साखळी उपोषण
By admin | Published: April 8, 2016 02:23 AM2016-04-08T02:23:43+5:302016-04-08T02:23:43+5:30
गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी सराफा दुकानांमध्ये मोठी गर्दी असते.
यवतमाळ : गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी सराफा दुकानांमध्ये मोठी गर्दी असते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीसुद्धा सराफा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमाने दरवर्षी या दिवशी सोने खरेदी करणाऱ्या असंख्य ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.
गेल्या ३८ दिवसांपासून सुरू असलेले सुवर्णकारांचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे बुधवारपासून येथील दत्त चौकात साखळी उपोषण आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. उपोषण मंडपाला आतापर्यंत आमदार मदन येरावार, नगराध्यक्ष सुभाष राय, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने आदींनी भेटी देऊन सराफांच्या मागण्या समजून घेतल्या. या आंदोलनात यवतमाळ सराफा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सारंग भालेराव, सचिव किशोर पालतेवार, शहराध्यक्ष किसन कदम, सचिव रत्नाकर पजगाडे, उपाध्यक्ष सुरेंद्र लुणावत, सदीप कदम, प्रवीण कावळे, सुरज झांबड, बंटी पराजिया, संजय कैपिल्यवार, सागर मंडमाळे, संतोष लाला, संजय लाला, शैलेश लष्करी, निलेश राठी, अजित मोरे, गिरीष सुराणा, संतोष खेतान आदींसह मोठ्या संख्येने सुवर्णकार व कारागिर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)