एसटीपुढे आंतरजिल्हा वाहतुकीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 07:00 AM2020-08-18T07:00:00+5:302020-08-18T07:00:13+5:30

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान असणार आहे.

The challenge of inter-district transport before ST | एसटीपुढे आंतरजिल्हा वाहतुकीचे आव्हान

एसटीपुढे आंतरजिल्हा वाहतुकीचे आव्हान

Next
ठळक मुद्देदररोज ११ कोटींच्या नुकसानीची भीती

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू असताना ‘एसटी’ला किलोमीटरमागे दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. आता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान असणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे १८ हजार ५०० बसेस आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या सर्व बसेस पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करीत होत्या. एक किलोमीटरमागे ३० ते ३५ रुपये आवक, असे एसटीच्या उत्पन्नाचे ढोबळमानाने सूत्र आहे. मात्र विविध कारणांमुळे उत्पन्नाच्या या आकड्यापर्यंतही एसटी पोहोचू शकत नव्हती. २२ ते २३ रुपये उत्पन्न येत होते. परिणामी मागील काही वर्षात एसटीचा तोटा वाढत गेला आहे.

पूर्ण लॉकडाऊन काळात एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचा फटका बसत होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गंत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. एवढेही प्रवासी मिळविण्यासाठी एसटीला ‘आवाज’ मारण्याची वेळ आली आहे. तास-दीड तासात मिळेल तेवढे प्रवासी घेऊन एसटी मार्गस्थ होत आहे. मार्गात कुठेही थांबायचे नसल्याने थेट प्रवासी घेऊन बस निघत आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे.

आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्यानंतर सव्वाशे ते दीडशे किलोमीटरपर्यंत एसटीचा प्रवास होणार आहे. शंभर किलोमीटरमागे तीन हजार ५०० रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. निम्मे २२ प्रवाशाचे तिकीट भाडे १२५ रुपये झाल्यास दोन हजार ७५० रुपये एवढेच उत्पन्न येते. शंभर किलोमीटर मागे ७५० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. जाण्या-येण्याच्या एका फेरीमागे १५०० रुपयांचा दणका एसटीला बसतो. आज २२ प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. आंतरजिल्हा प्रवासी मिळण्यासाठी एसटीच्या नाकीनऊ येणार आहे. त्यामुळेच या वाहतुकीचे मोठे आव्हान एसटीपुढे आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरू करणे आवश्यकच आहे. मात्र एसटीचे नुकसान होणार नाही, ही बाबही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

संपूर्ण भाड्याचा आकार सरकारने द्यावा
जिल्हा बाहेर वाहतूक सुरू करताना प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षा सांभाळणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे २२ प्रवासी वाहतूक करावी लागणार आहे. हे महामंडळ जनतेचे आणि सरकारचे आहे. तेव्हा एसटीचा वाढता तोटा लक्षात घेता संपूर्ण भाड्याचा आकार सरकारने एसटीला वेळेवर देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी नोंदविली आहे.

Web Title: The challenge of inter-district transport before ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.