१० दिवसांत ३४० कोटींच्या वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:26 AM2021-07-22T04:26:07+5:302021-07-22T04:26:07+5:30

या बैठकीला उपमहाव्यवस्थापक शरद दाहेदर, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंते संजयकुमार चितळे, मंगेश वैद्य, संजय आडे यांच्यासह सर्व ...

Challenge of recovery of Rs 340 crore in 10 days | १० दिवसांत ३४० कोटींच्या वसुलीचे आव्हान

१० दिवसांत ३४० कोटींच्या वसुलीचे आव्हान

Next

या बैठकीला उपमहाव्यवस्थापक शरद दाहेदर, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंते संजयकुमार चितळे, मंगेश वैद्य, संजय आडे यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते. यावेळी प्रादेशिक संचालकांनी वसुली हा महावितरणचा कणा असल्याचे सांगितले. वीज ग्राहकांकडे सुमारे ७२ हजार कोटींच्या घरात थकबाकी असताना महावितरणला वीज ग्राहकांची विजेची गरज भागविण्यासाठी हजारो कोटींचे कर्ज काढून वीजपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम येणाऱ्या काळात वीजपुरवठ्यावर होण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तविली.

बॉक्स

जिल्ह्यात चार लाख ग्राहक थकबाकीदार

जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील चार लाख ६६ हजार वीज ग्राहकांकडे जुलै महिन्यात ३८१ कोटी वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी मागील २० दिवसात केवळ ४१ कोटी रुपये वसूल झाले. त्यामुळे पुढील १० दिवसात ३४० कोटी वसुलीचे आव्हान वीज कर्मचाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. हे टार्गेट पूर्ण न केल्यास जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी लागणार असल्याचा इशारा प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिला.

Web Title: Challenge of recovery of Rs 340 crore in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.