‘एसटी’तील गोंधळ थांबविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 09:49 PM2019-07-15T21:49:13+5:302019-07-15T21:49:32+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात सुरू असलेला गोंधळ थांबविण्याचे आव्हान वरिष्ठांपुढे आहे. विविध कारणांमुळे रद्द होणाऱ्या बसफेऱ्या, वाढलेले ब्रेकडाऊन यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, शिवशाही बसचे अधिक शेड्यूल असलेल्या मार्गावर इतर बसेसचा तुटवडा आहे.

The challenge to stop the confusion in 'ST' | ‘एसटी’तील गोंधळ थांबविण्याचे आव्हान

‘एसटी’तील गोंधळ थांबविण्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देबसफेऱ्या रद्द : प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय, ब्रेकडाऊनचे प्रमाण अनियंत्रित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात सुरू असलेला गोंधळ थांबविण्याचे आव्हान वरिष्ठांपुढे आहे. विविध कारणांमुळे रद्द होणाऱ्या बसफेऱ्या, वाढलेले ब्रेकडाऊन यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, शिवशाही बसचे अधिक शेड्यूल असलेल्या मार्गावर इतर बसेसचा तुटवडा आहे.
चालक, वाहक नाही. आगारात बस शिल्लक नाही, तिकीट मशीन खराब आहे या व इतर अनेक प्रकारच्या कारणांमुळे बसेस उशिरा धावण्याचे प्रमाण यवतमाळ विभागात वाढले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात सोडल्या जाणाºया फेऱ्यांविषयी दुर्लक्ष केले जाते. अमरावती, नागपूर मार्गावर शिवशाही बसची गर्दी आहे. या बसला प्रवासी मिळावे यासाठी केवळ बाहेरून येणाऱ्या साध्या बसेसच या मार्गावर धावतात. स्थानिक आगार पातळीवरून कितीही गर्दी असली तरी साध्या बसेस लावल्या जात नाही.
नादुरुस्त असलेल्या बसेस आगारात निर्धारित कालावधीत दुरुस्त केल्या जात नाही. जिल्ह्यातील जवळपास आगारांमध्ये बसचा तुटवडा आहे. अशावेळी बस तत्काळ दुरुस्त करून उपयोगात आणली जाईल, अशी अपेक्षा असते. मात्र विविध कारणे सांगत दुरुस्तीला विलंब लावला जातो. अनेक चालक-वाहकांना अशावेळी कामगिरी मिळत नाही. तिकीट मशीनचे चार्जींग लवकरच उतरते. तिकीट ट्रे चालवायचे झाल्यास चालकांना किलोमीटरचा विसर पडला आहे. अशावेळी मशीनचा आग्रह धरला जातो. नादुरुस्त मशीनची गर्दी कमी होत नाही. नवीन मशीन उपलब्ध करून दिली जात नाही. अनेक बसेसच्या मागील टायरची हालत खस्ता झाली आहे. खिळखिळ्या झालेल्या बसमधून प्रवास करताना नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे. गळती लागत असलेल्या अनेक बसेस आजही मार्गावर धावत आहे. अशा बसेस मार्गावर धावल्यास कारवाई केली जाईल, असे परिपत्रक आहे. परंतु अपवादानेही कारवाई झालेली नाही. वरिष्ठ अधिकाºयांपुढे या सर्व बाबी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आहे.
प्रशिक्षणार्थ्यांकडून वसुलीप्रकरण थंड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा मलीन होईल असा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला. चालक प्रशिक्षण केंद्रातील शिकाऊ उमेदवारांकडून महामंडळाचा कर्मचारी पैसे घेत असल्याची चित्रफित सर्वदूर पसरली. प्राथमिक चौकशीत ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, पैसे घेणाऱ्या लिपिकाला निलंबित करण्यात आले. मात्र या प्रकारात गुंतलेल्या अनेक मंडळींवर कारवाई झाली नाही. सदर प्रकरणाची तक्रार पोलिसात द्या, असा स्पष्ट आदेश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिला. पोलीस सहकार्य करत नाही, हे कारण सांगत अजूनतरी तक्रार झाली नाही. विभागातील वरिष्ठ अधिकाºयाचे नाव या प्रकरणात घेतले जाते. चौकशी अधिकाºयांवर दबाव तर नसावा, अशी साधार शंका व्यक्त केली जात आहे.

Web Title: The challenge to stop the confusion in 'ST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.