बोंडअळीच्या मदत आदेशात बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:14 PM2018-03-14T22:14:14+5:302018-03-14T22:14:21+5:30
गुलाबी बोंडअळीच्या मदतीतून जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळे वगळण्यात आली. यामुळे सव्वा लाख शेतकरी मदतीतून बाद झाले.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : गुलाबी बोंडअळीच्या मदतीतून जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळे वगळण्यात आली. यामुळे सव्वा लाख शेतकरी मदतीतून बाद झाले. हा निर्णय मागे घेण्याची मागणी महागाव तालुक्यातील शेतकºयांनी मुख्यमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली. मागणी मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही दिला आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतरही पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न ग्राह्य धरून मदत देण्याचा फतवा निघाला आहे. त्यातही जिल्ह्यातील तब्बल ४२ महसूल मंडळांना मदतीतून वगळण्यात आले. यात महागाव तालुक्यातील मंडळांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे बोंडअळीचा विषय महागाव तालुक्यातून समोर आला. मात्र तीच गावे मदतीमधून बाद झाली. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकºयांनी राज्य सरकारच्या कामकाजावर तीव१ रोष नोंदविला आहे.
बोंडअळीच्या मदतीचा सध्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकºयांनी केली ाहे. सरकारने निर्णय मागे न घेतल्यास जिल्हा कचेरीला घेराव घालण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. यावेळी शेतकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी मनीष जाधव, नरेंद्र जाधव, मनोहर चिचपाड, प्रदीप जाधव, शेख हनिफ, तुकाराम चव्हाण, अरविंद चिचपाड, देवानंद अंबोरे, संजय चव्हाण, वसंत जाधव, अनुप चव्हाण, विलास जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते