‘वसंत’च्या निवडणुकीने बदलविली समीकरणे

By admin | Published: January 23, 2017 01:07 AM2017-01-23T01:07:51+5:302017-01-23T01:07:51+5:30

तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि सात हजार ४४९ मतदार असलेल्या येथील वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या

Changed equations by 'Vasant' elections | ‘वसंत’च्या निवडणुकीने बदलविली समीकरणे

‘वसंत’च्या निवडणुकीने बदलविली समीकरणे

Next

दोन गटांत थेट लढतीचे संकेत : राळेगाव तालुक्यात दोन निवडणुकांची रणधुमाळी
राळेगाव : तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि सात हजार ४४९ मतदार असलेल्या येथील वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या १९ फेब्रुवारी रोजी होवू घातलेल्या निवडणुकीने १६ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सर्वच राजकीय समिकरणे बदलून टाकली आहे. राळेगाव शहर वगळता ७१ हजार १७९ मतदार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे, तर राळेगाव सोडून सात हजार वसंत जिनिंगचे भागधारक मतदार दोन्हीकडे सारखेच असल्याने प्रत्येक भागधारक मतदाराच्या घरात पाच-दहा मते असल्याने जिनिंगचा उमेदवार, नेता, पक्ष, गटाची, मतदाराची चॉईस जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर प्रभाव टाकू शकते. तर जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार त्यांचे नेते, पक्ष, गट याची मतदारांची चॉईस वसंत जिनिंग निवडणुकीवर प्रभाव टाकू शकणार आहे.
‘वसंत’साठी उमेदवारी अर्ज भरण्यास २४ जानेवारीपर्यंत मुदत आहे. सहकार क्षेत्रात सोसायट्या, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर गटाच्या ताब्यात आहे. वसंत जिनिंगचे मावळते अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे मानकर गटाचे, तर उपाध्यक्ष अरविंद वाढोणकर हे माजी आमदार प्रा. वसंत पुरके गटाचे आहेत. गतवेळी झालेल्या निवडणुकीत मानकर व पुरके गटाची युती होती. त्यामुळे जिनिंगवर दोन्ही गटाचे संचालक निवडून आले होते. यावेळी मानकर गट व पुरके गटात युतीबाबत अद्याप तरी भूमिका स्पष्ट झालेली नाही. विविध सोसायट्या, बाजार समितीची निवडणूक या दोन्ही गटांनी आमनेसामने संपूर्ण शक्तीनिशी लढली. तत्पूर्वीच्या निवडणुकीत दगाफटका झाल्याच्या आरोपावरून नेते व कार्यकर्त्यांमध्ये आलेल्या वितुष्टावरून वसंत जिनिंगची निवडणूकही या दोन्ही गटात सरळ लढत होईल, असे संकेत दिसत आहे.
मानकर नेहमी मी काँग्रेसचाच ही बाब जोर देवून सांगत असताना काँग्रेसच्याच दोन्ही गटात ही निवडणूक झाली, तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्याचा फार मोठा प्रभाव निश्चित पडणार असे स्पष्ट होत आहे. सहकार क्षेत्रात इतर पक्षांचा फारसा प्रभाव नसल्याने सहकारातील या निवडणुकीतील मतदारांचा कौल मिळविणे आव्हानात्मक ठरणार आहे. जिल्हा परिषद-पंचायत समितीची निवडणूक प्रथम म्हणजे १६ फेब्रुवारीला होणार आहे. जिनिंग निवडणुकीतील तयारीचा फायदा ती निवडणूक लढविणाऱ्या पक्ष, गट, नेत्याला अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिनिंगची निवडणूक १९ फेब्रुवारीला होणार असल्याने त्याकरिता पक्ष, गट, उमेदवारांची शक्ती पुढील दोन दिवसात एकवटता व अजमावता येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Changed equations by 'Vasant' elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.