नवऱ्यानेच केली पत्नीची फसवणूक, लावला १२ लाखांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:04 PM2021-12-01T17:04:51+5:302021-12-01T17:22:24+5:30

पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

charges filed on husband for cheating on wife of rs 12 lakh bank loan | नवऱ्यानेच केली पत्नीची फसवणूक, लावला १२ लाखांचा चुना

नवऱ्यानेच केली पत्नीची फसवणूक, लावला १२ लाखांचा चुना

Next
ठळक मुद्देपोलिसात गुन्हा दाखलपरस्परच काढले वाहनासाठी कर्ज

यवतमाळ : लग्नानंतर वर्षभरातच महिलेला सासरच्या मंडळींनी माहेरहून १५ लाख रुपये आण, असा तगादा लावला. हा छळ असह्य झाल्याने त्या महिलेने चिमुकल्या मुलीला घेऊन आपले माहेर गाठले. मात्र, पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

साैरभ गजानन डुचाळे (३२, रा. बाजोरियानगर), मनीषा गजानन डुचाळे (५५), श्रद्धा पंकज ठाकरे (३५, रा. कोथरूड पुणे), स्वप्नील इंजाळकर (रा. आर्णी रोड यवतमाळ), संतोष रामभाऊ लोणारे (३२, रा. सारस्वत अर्बन मल्टिसिटी निधी लिमिटेड), गजानन रामकृष्ण डुचाळे (रा. बाजोरियानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

साैरभ हा त्याच्या पत्नीला माहेरहून १५ लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत होता. दोन वर्षांच्या संसारानंतर पत्नीला घराबाहेर काढले. तो तिला घटस्फोटाची मागणी करू लागला. यासंदर्भात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात या महिलेने २९ ऑक्टोबर २०१९ रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर ती माहेरी वडिलांकडेच राहू लागली.

१६ मे २०२१ रोजी या महिलेला सारस्वत अर्बन मल्टिसिटी निधी लिमिटेड या पतसंस्थेतून नोटीस आली. १२ लाख रुपये वाहन कर्ज उचलले असून त्याची परतफेड केली जावी, असे त्यात नमूद होते. कुठलेही वाहन घेतले नसताना, कर्ज कसे काय? असा धक्का त्या महिलेला बसला. तिने वडिलांना घेऊन संबंधित पतसंस्थेचे कार्यालय गाठले. या ठिकाणी महिलेच्या नावाने बचत खाते क्रमांक काढण्यात आला होता. मात्र बँकेने त्या खात्याचे स्टेटमेंट दिले नाही.

महिलेचा पती साैरभ डुचाळे, सासू-सासरे यांनी संगनमत करून संतोष रामभाऊ लोणारे यांच्या मदतीने खोटी कागदपत्रे तयार करून परस्पर १२ लाख रुपयांचे वाहनकर्ज उचलले. खोटे कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याची तक्रार अवधूतवाडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध दाखल केली आहे. याचा अधिक तपास अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: charges filed on husband for cheating on wife of rs 12 lakh bank loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.