तलवारीसह पळणाऱ्यास पाठलाग करून पकडले

By admin | Published: January 16, 2016 02:47 AM2016-01-16T02:47:18+5:302016-01-16T02:47:18+5:30

शहरातील टिळक चौकात गुरूवारी रात्री एका युवकाजवळून पोलिसांनी गस्तीवर असताना तलवार जप्त केली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Chasing those who escaped with the sword caught | तलवारीसह पळणाऱ्यास पाठलाग करून पकडले

तलवारीसह पळणाऱ्यास पाठलाग करून पकडले

Next

वणी : शहरातील टिळक चौकात गुरूवारी रात्री एका युवकाजवळून पोलिसांनी गस्तीवर असताना तलवार जप्त केली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी शेख अशपाक मो.शफी (३०) रा.शास्त्रीनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरूवारी रात्री अशपाक एका दुचाकीने टिळक चौकातून भरधाव वेगाने जात होता. या युवकाला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता. मात्र पोलिसांना गुंगारा देत तो वेगाने समोर पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अखेर बसस्थानकाजवळ पकडले. त्याच्या दुचाकीच्या सीटजवळ एक लोखंडी धारदार तलवार आढळली. तिला पितळी मूठ आहे. ही तलवार तब्बल ८४ सेंटीमीटर लांब आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख अशपाकविरूद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chasing those who escaped with the sword caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.