घाटंजी येथे डफडे वाजवा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:33 PM2017-10-31T23:33:05+5:302017-10-31T23:33:19+5:30
येथील पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथील पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग निकोडे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर डफडे वाजवा आंदोलन करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकूल लाभार्थ्यांना विनाविलंब देयके द्यावी, शौचालयाची देयके तातडीने काढावी, रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा, कीटकनाशक फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला पाच लाख रुपये देण्यात यावे आदी मागण्या यावेळी केल्या. प्रभारी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यास पाचारण करण्यात आले. परंतु त्यांनी बाहेर येवून निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर आंदोलकांनी आत जावून निवेदन दिले. प्रभारी गटविकास अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर तालुक्यातील जनतेने रोष व्यक्त केला.