एटीएमची माहिती देऊन फसतात; यात शिकले सवरलेलेच आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 05:00 AM2022-06-06T05:00:00+5:302022-06-06T05:00:10+5:30

ऑनलाईन व्यवहारात प्रत्येक बाबीची पडताळणी करण्याची संधी मिळते. हे ना ते सर्वात कमी किमतीत काय मिळणार, आपले ऑनलाईन व्यवहार सुरळीत राहिले पाहिजे. त्यासाठी केवायसी, बँकिंग ॲप सुरू ठेवण्यासाठी बतावणी केली जाते व यातून गोपनीय माहिती मिळवित बँकेतील पैशावर डल्ला मारला जातो. या घटना सातत्याने घडत आहे; मात्र याचा तपास होत नाही. आरोपींना अटकही केली जात नाही.

Cheat by giving ATM information; In this, everyone learned to be at the forefront | एटीएमची माहिती देऊन फसतात; यात शिकले सवरलेलेच आघाडीवर

एटीएमची माहिती देऊन फसतात; यात शिकले सवरलेलेच आघाडीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बँकिंगचे सर्व व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने करता येतात. अनेकांनी तर खिशात रोख पैसे वापरणेच बंद केले आहे. मोबाईलच्या माध्यमातून लाखो रुपयांचा व्यवहार सहज करता येतो. हे सर्व तंत्रज्ञान हाताळणारी मंडळी उच्चशिक्षित वर्गातीलच आहेत. त्यामुळे ऑनलाईन फ्राॅडमध्ये अडकणाऱ्यांची संख्या शिक्षितांची तुलनेने जास्त आहे.
ऑनलाईन व्यवहारात प्रत्येक बाबीची पडताळणी करण्याची संधी मिळते. हे ना ते सर्वात कमी किमतीत काय मिळणार, आपले ऑनलाईन व्यवहार सुरळीत राहिले पाहिजे. त्यासाठी केवायसी, बँकिंग ॲप सुरू ठेवण्यासाठी बतावणी केली जाते व यातून गोपनीय माहिती मिळवित बँकेतील पैशावर डल्ला मारला जातो. या घटना सातत्याने घडत आहे; मात्र याचा तपास होत नाही. आरोपींना अटकही केली जात नाही. तपासाचा खर्च अधिक होत असल्याने याबाबत टाळाटाळच केली जाते.

७० जणांची फसवणूक   गत पाच महिन्यात
जिल्ह्यात मागील पाच महिन्यात एटीएम कार्ड, ऑनलाईन व्यवहार, विविध ॲपच्या माध्यमातून फसवणूक झालेल्यांची संख्या ७० आहे. अजूनही अशा घटना सातत्याने घडत आहे. नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. 

०४ तक्रारी येत आहेत दररोज
जिल्ह्यात दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे ऑनलाईनच्या प्रकारात फसवणूक झाल्याच्या सरासरी चार तक्रारी दाखल होतात. पोलीस ठाणे स्तरावरून सायबरकडे तपास जातो. 

गुन्हा उघड होतो, अटकेची कारवाई नाही
फसवणुकीच्या गुन्ह्यात सायबरकडून आरोपीचे लोकेशन ट्रेस केेले जाते. पोलीस ठाणे स्तरावरून पुढे त्यावर कुठलीच कारवाई होत नाही. परिणामी गुन्हा प्रलंबित राहतो, असे ४०० गुन्हे प्रलंबित आहे. 
 

एकाच आठवड्यात चार शिक्षकांना गंडा 

ऑनलाईन व्यवहार हा सुशिक्षितांकडूनच केला जातो. यामध्ये गफलत झाल्यास आर्थिक फटका बसतो. शहरात मागील आठवड्यात अशा चार घटना झाल्या.
अवधूतवाडी पोलीस ठाण्याहद्दीतच शिक्षकांना ऑनलाईन फ्राॅडमध्ये लुबाडण्यात आले. योनो ॲपचा वापर अंगलट आला. 

प्रलोभन टाळून वापर सुरक्षित 
ऑनलाईन व्यवहार करताना प्रलोभनाला बळी पडू नये तरच आपण सुरक्षित राहू शकतो. छोटीशी चूकही आपल्या बँक खात्यातील रकमेला धोक्यात आणू शकते. सतर्क राहत समजून-उमजून अधिकृत बाबींचाच वापर केला जावा. जेणेकरून फसवणूक होणार नाही.     
- अमोल पुरी, सायबर सेल प्रभारी

 

Web Title: Cheat by giving ATM information; In this, everyone learned to be at the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.