यवतमाळची सर्पमित्र क न्या

By admin | Published: August 7, 2016 01:18 AM2016-08-07T01:18:43+5:302016-08-07T01:18:43+5:30

मुलांप्रमाणे मुलीही प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. मग साप पकडण्यातच का मागे राहतील?

Check out Yavatmal | यवतमाळची सर्पमित्र क न्या

यवतमाळची सर्पमित्र क न्या

Next

 नागपंचमी विशेष : डॉक्टरीचे शिक्षण, तरीही साप पकडण्याचा छंद
रूपेश उत्तरवार यवतमाळ
मुलांप्रमाणे मुलीही प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. मग साप पकडण्यातच का मागे राहतील? अशीच एक सर्पमित्र कन्या डॉ. अनुराधा दिवाकर तिरमारे पुढे आली आहे. वैद्यकीय शिक्षणातील पदव्यूत्तर पदवीचे (एमएस) ती शिक्षण घेत आहे. मात्र, डॉक्टरकी शिकता-शिकता गेल्या सहा वर्षांपासून साप पकडण्याचा धाडसी छंदही तिने जोपासला आहे.
कोब्रा अ‍ॅडव्हेंचर गृपचे सदस्य असलेले दिवाकर तिरमारे साप पकडण्याचे काम करतात. वडिलांचे हे धाडस पाहून अनुराधाही प्रभावीत झाली. वडील प्रशिक्षण वर्गाला जाताना अनुराधा आवर्जून हजेरी लावत होती. यामुळे सापाबद्दलचे गैरसमज हळूहळू दूर झाले. विषारी आणि बिनविषारी साप कोणते, ते कसे ओळखायचे, हे तिला सहज लक्षात आले. यासाठी तिने सापाच्या विविध जातींचा अभ्यास केला. आतातर ती साप पकडण्यात सराईत झाली आहे.
साप पकडण्याची स्टिक असो अथवा नसो मी सहजतेने साप पकडते, असे अनुराधा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाली. तिने स्वतंत्रपणे पहिला साप २००९ मध्ये पकडला. कॉलनीत साप निघाला म्हणून शेजारच्या घरातील सारे लोक बाहेर आले होते. अनुराधा आत गेली. त्यावेळी सर्वांनी तिला ‘तू राहू दे, बाबा आल्यावर साप पकडतील’ असे म्हणत बाजूला सारले. ‘सापावर पाळत ठेव. साप पकडू नको’ असे म्हणत अनुराधाला सगळ्यांनीच मज्जाव केला. मात्र, घरातला साप बाहेर येताच अनुराधाने काही क्षणात त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी शेजारच्या काकू जोरदार किंचाळल्या होत्या. त्यांना अनुराधाने साप पकडल्याने धक्काच बसला होता. तेव्हापासून अनुराधा कॉलनीमधील सर्वात धीट मुलगी म्हणून ओळखली जाते.

 

Web Title: Check out Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.