मुख्यमंत्र्यांनी देल्ली हो कर्जमाफीची जडीबुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:21 PM2018-09-08T22:21:11+5:302018-09-08T22:22:18+5:30

मोदी सरकार, देवेंद्र सरकारच्या निर्णयांनी शेतकऱ्यांना बसलेले फटके, या झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यासोबतच पेट्रोलचे वाढते भाव, बोंडअळीची लांबलेली मदत, शेतकऱ्यांच्या न थांबलेल्या आत्महत्या हे विषय टीकाकारांनी झडत्यांतून मांडले आहेत.

The Chief Minister has given loan waiver | मुख्यमंत्र्यांनी देल्ली हो कर्जमाफीची जडीबुटी

मुख्यमंत्र्यांनी देल्ली हो कर्जमाफीची जडीबुटी

Next
ठळक मुद्देपोळ्याच्या झडत्यांची सोशल मीडियात धूम : कर्जमाफी, नुकसान भरपाई, महागाई, सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
घुटी रे घुटी आंब्याची घुटी
मुख्यमंत्र्यानं देल्ली हो
कर्जमाफीची जडीबुटी
त्या जडीबुटीले आरा ना धुरा
मुख्यमंत्रीसाहेब,
भिक नको हो कुत्रा आवरा
एक नमन गौरा पार्वती
हर बोला हर हर महादेव...
अशा झडत्या पोळ्याच्या पूर्वसंध्येपासूनच सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्या आहेत. पोळ्याच्या झडत्यांच्या निमित्ताने दरवर्षी ग्रामीण माणूस आपले गाऱ्हाणे जगजाहीर करतो. यंदा पोळ्याचीही वाट पाहता शेतकऱ्यांच्या लेकरांनी सोशल मीडियातून तीक्ष्ण झडत्या व्हायरल केल्या आहेत. पोळ्याच्या गर्दीत न जाताही घरबसल्या मनातली खदखद व्यक्त केली जात आहे.
काया मातीत टोबतो बिया
तूर घेणारे आम्हाला घालतात शिव्या
शिव्या घालणारे खातेत आमचंच
काय बिघडवलं आम्ही तुमचं
घामाचा पैसा मागतो आम्ही
थंड हवेत बसता हो तुम्ही
घाम गाळून पिकवितो शेती
नादी लागाल तर होईल माती
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...
अशा झडत्या हातोहात तयार करून पसरविल्या जात आहेत. मोदी सरकार, देवेंद्र सरकारच्या निर्णयांनी शेतकऱ्यांना बसलेले फटके, या झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यासोबतच पेट्रोलचे वाढते भाव, बोंडअळीची लांबलेली मदत, शेतकऱ्यांच्या न थांबलेल्या आत्महत्या हे विषय टीकाकारांनी झडत्यांतून मांडले आहेत. झडत्यासोबतच पोळ्याचे औचित्य साधून ‘बैल पोळ्याच्या शुभेच्छा’ पाठवून कामचुकारांची मिश्किल फिरकीही घेतली जात आहे. तर कुठे बैलांचा फोटो टाकून ‘आम्ही कसेही जगू, आणखी मेहनत करू, फक्त मालक तुम्ही मरू नका’ असे भावनिक आवाहन करणारे मेसेजही फिरविले.

Web Title: The Chief Minister has given loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.