मुख्यमंत्री दौ-यात सेनेच्या मंत्र्यांना वगळले, पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 06:13 AM2017-10-23T06:13:19+5:302017-10-23T06:14:04+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यवतमाळ दौºयातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना वगळण्यात आले. याबद्दल राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यवतमाळ दौ-यातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना वगळण्यात आले. याबद्दल राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा दौरा गोपनीय ठेवण्यामागे मुख्यमंत्र्यांना आणि विशेषत: भाजपाला शिवसैनिकांची भीती वाटत असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
यवतमाळ जिल्ह्यात दोनच मंत्री असताना शिवसेनेला या दौºयापासून दूर ठेवण्यामागील भाजपाची भूमिका अनाकलनीय आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मी विरोधी पक्षाचा आमदार असतानाही मला मुख्यमंत्र्यांच्या दौºयाबाबत आवर्जून कळविले जात होते. मात्र, शिवसेना हा भाजपाचा सत्तेतील सहकारी पक्ष असतानाही आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या दौºयापासून दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य वाटते, असे संजय राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेत असताना सहपालकमंत्र्यांना याची साधी कल्पनाही देऊ नये हे अतिशय चुकीचे आहे.
एकीकडे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर भोजनासाठी सहपरिवार आमंत्रित करतात आणि दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांच्याच जिल्ह्यात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौºयातून वगळतात, हे राजकीयदृष्ट्या योग्य नाही. यामागे नेमका राजकीय डाव आहे की प्रशासकीय, याचा शोध घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनेला मिळणाºया या दुय्यम वागणुकीचा मुद्दा आपण वरपर्यंत लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
>मुख्यमंत्र्यांना शेतकºयांची भीती वाटते काय?
फवारणीबाधित शेतकºयांच्या भेटीसाठी येताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौºयाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली. शिवसेनेच्या मंत्री, आमदारांना दौºयातून वगळले. मुख्यमंत्र्यांना शेतकºयांची एवढी भीती वाटते काय, असा सवाल शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.शिवसेनेच्या भाऊबीज कार्यक्रमासाठी दिवाकर रावतेही यवतमाळात होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या दौºयाबाबत आपण आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना कोणतीही माहिती दिली नसल्याचे रावते यांनी सांगितले. मुख्यमंत्री यवतमाळात येणार असल्याची माहिती आपल्याला ‘लोकमत’मधून मिळाली. पीडितांशी दोन शब्द बोलायचे असतात. त्यांचे दु:ख ऐकून घ्यावे लागते. मात्र, हा दौरा अतिशय गोपनीय पद्धतीने उरकण्यात आला. यावरून मुख्यमंत्र्यांना शेतकºयांची भीती वाटते काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
>काँग्रेसने दाखविले काळे झेंडे
मुख्यमंत्री फडणवीस यांना येथील विश्रामगृह परिसरात युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी काळे झेंडे दाखून निषेध केला. या पदाधिकाºयांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या दौºयाची प्रशासनाने प्रचंड गोपनीयता बाळगली. वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता.