चिखलवर्धा गावाला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:30 AM2021-05-28T04:30:29+5:302021-05-28T04:30:29+5:30
गावात जानेवारीमध्ये निवडणूक झाली. नंतर वर्षा कनाके यांची सरपंचपदी निवड झाली. सरपंचपदाची निवड होऊन आता जवळपास तीन महिने ...
गावात जानेवारीमध्ये निवडणूक झाली. नंतर वर्षा कनाके यांची सरपंचपदी निवड झाली. सरपंचपदाची निवड होऊन आता जवळपास तीन महिने उलटले. सचिवांनी मासिक बैठक घेतली व सर्व खाते बदल करण्याचे ठरविले. परंतु अद्याप एकही खाते बदल करण्यात आले नाही, असा कनाके यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी आता सचिवांच्या भोंगळ कारभाराविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
गावात ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य कामे होत आहे. सरपंचांना विश्वासात घेऊन काम करण्यात आले नाही. चिलखवर्धा ग्रामपंचायतअंतर्गत गवरधड, गोविंदपूर, धनगर (बेडा) यांचा समावेश आहे. तेथे भीषण पाणीटंचाईची समस्या आहे. मात्र, ग्रामसेवकांना मागील पंचवार्षिक प्राप्त निधी व खर्च निधीची माहिती विचारली असता दिली जात नाही. ते गावात नियमित येत नाही. गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही चौकशी होत नाही. त्यामुळे सरपंच हतबल झाल्या आहे. गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरपंचांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती सभापती यांनी गावाला भेट देऊन समस्या सोडवण्यास मदत करावी, अशी विनंती सरपंच वर्षा कनाके यांनी केली आहे.