चिमुकल्यांनी बाबांना दिले आकाशकंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:31 PM2017-10-15T22:31:21+5:302017-10-15T22:31:39+5:30

दिवाळी आली की, मुले फटाके, कपडे घेण्यासाठी बाबांकडे हट्ट धरतात. पण खेड्यातल्या मुलांना बाबाच्या अडचणीची जाणीव असते.

Chimukulya gave to Baba Akashakandel | चिमुकल्यांनी बाबांना दिले आकाशकंदील

चिमुकल्यांनी बाबांना दिले आकाशकंदील

googlenewsNext
ठळक मुद्देअंजीत किमया : स्वनिर्मितीच्या आनंदासह पैशांचीही केली बचत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिवाळी आली की, मुले फटाके, कपडे घेण्यासाठी बाबांकडे हट्ट धरतात. पण खेड्यातल्या मुलांना बाबाच्या अडचणीची जाणीव असते. म्हणून चिमुकल्या मुलांनीच बाबांना छान आकाशकंदील बनवून दिले. मुलांच्या या परिपक्वतेला साथ दिली त्यांच्या गुरुजींनी. अंजी नृसिंह (ता.घाटंजी) येथील जिल्हा परिषद शाळेने हा उपक्रम राबविला.
दिवाळीचा सण आला आहे. त्यामुळे आकाशकंदिल लावले जात आहे. ५०० पासून हजारांपर्यंतच्या आकाशदिव्यांची बाजारात चलती आहे. पण शेतकरी, मजूर कुटुंबात हा खर्चही झेपणे कठीण आहे. त्यामुळे उपक्रमशील शिक्षक प्रशांत गवळी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासह त्यांचा पालकांनाही दिलासा देणारी आकाशकंदिल निर्मिती कार्यशाळा घेतली. अत्यंत कमी खर्चातील सेंच्युरी पेपर, कार्डशिट, रंगीत कागद आणि परिसरातच मोफत मिळणाºया साहित्याचा वापर करून आकाशकंदिल तयार करण्यात आले. स्वत:च्या हातांनी बनविलेल्या या आकाशदिव्यांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आगळा आनंद पसरला. स्वत:च्या लेकराने घडविलेला दिवा घरावर झळकविताना पालकांनाही मोठा आनंद मिळणार आहे. या कार्यशाळेकरिता मुख्याध्यापक विलास डोमाळे, रमेश डोहळे, विजय खोंडे, राजू शेंडे, वंदना कोवे, उषा घोडाम, शितल दिडशे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले.

Web Title: Chimukulya gave to Baba Akashakandel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.