४० लाख मेट्रिक टन सोयापेन्ड खरेदीसाठी चीनचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:27 PM2018-09-13T12:27:37+5:302018-09-13T12:29:31+5:30

राज्यातील सोयापेन्ड (ढेप) खरेदीसाठी चीनने पुढाकार घेतला असून चीनच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. चीनने दरवर्षी तब्बल ४० लाख मेट्रिक टन सोयापेन्ड खरेदीची तयारी दर्शविली असून पुढील चर्चेसाठी राज्याच्या शिष्टमंडळला आमंत्रित केले आहे.

China's initiative to buy 40 million metric tonnes of soyapand | ४० लाख मेट्रिक टन सोयापेन्ड खरेदीसाठी चीनचा पुढाकार

४० लाख मेट्रिक टन सोयापेन्ड खरेदीसाठी चीनचा पुढाकार

Next
ठळक मुद्देशिष्टमंडळाला निमंत्रणसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यातील सोयापेन्ड (ढेप) खरेदीसाठी चीनने पुढाकार घेतला असून चीनच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. चीनने दरवर्षी तब्बल ४० लाख मेट्रिक टन सोयापेन्ड खरेदीची तयारी दर्शविली असून पुढील चर्चेसाठी राज्याच्या शिष्टमंडळला आमंत्रित केले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात सोयापेन्डची निर्मिती केली जाते. मात्र त्याच्या विक्रीचा प्रश्न निर्माण होतो. चीनने खरेदीची तयारी दर्शविल्याने हा गुंता सुटणार आहे. राज्याचे शिष्टमंडळ येत्या १९ सप्टेंबरला चीन दौऱ्यावर जाणार आहे.
सोयाबीनला अधिक दर मिळावे म्हणून गतवर्षी आयात तेलाच्या किमती चारदा वाढविण्यात आल्या. तरीही सोयाबीनच्या दरात फारशी वाढ झाली नाही. यामुळे केंद्र शासनाने सोयापेन्ड निर्यातीवर १० टक्के अनुदानाची घोषणा केली. यामुळे सोयापेन्ड निर्यातीला चालना मिळून सोयाबीनचे दर वाढण्यास हातभार लागणार आहे. सोमवारी चीनचे कौन्सिलर थंगोसिया यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोयापेन्ड खरेदीची तयारी दर्शविली.
यावेळी चर्चेत मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सहभागी होते.

क्विंटलमध्ये ८२ किलो सोयापेन्ड
एक क्विंटल सोयाबीनपासून १८ किलो तेल आणि ८२ किलो सोयापेन्ड मिळते. सोयापेन्डच्या दरावरच सोयाबीनच्या किमती अवलंबून असतात. चीनने सोयापेन्ड खरेदीची तयारी दर्शविल्याने त्याचा लाभ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याना होणार आहे.

चीनच्या पुढाकारातून सोयापेन्ड खरेदीसाठी प्रस्ताव आला आहे. त्या अनुषंगाने एक समिती स्थापन झाली. या समितीचे सदस्य चीन दौऱ्यावर जाणार आहेत.
- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग

Web Title: China's initiative to buy 40 million metric tonnes of soyapand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती