‘चिंतामणी’ला ७२ किलो चांदीचा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:17 PM2019-03-11T21:17:18+5:302019-03-11T21:17:47+5:30

विदर्भाचे आराध्य दैवत चिंतामणीच्या मूर्तीला विजया-दशमीच्या मुहूर्तावर ५१ किलो चांदीपासून आकर्षक तेवढाच मोहक साज (प्रभावळ) करण्यात आला होता. आता त्यात आणखी २१ किलो चांदीपासून बनविलेल्या विविध आभूषणांची भर पडली आहे.

Chintamani got 72 kg of silver | ‘चिंतामणी’ला ७२ किलो चांदीचा साज

‘चिंतामणी’ला ७२ किलो चांदीचा साज

googlenewsNext
ठळक मुद्देकळंब येथे भक्तांचे दान : छत्र, मुकूट, कमरपट्टा आणि हार, गाभाऱ्याचे रूपही पालटले

गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : विदर्भाचे आराध्य दैवत चिंतामणीच्या मूर्तीला विजया-दशमीच्या मुहूर्तावर ५१ किलो चांदीपासून आकर्षक तेवढाच मोहक साज (प्रभावळ) करण्यात आला होता. आता त्यात आणखी २१ किलो चांदीपासून बनविलेल्या विविध आभूषणांची भर पडली आहे.
यापूर्वी मूर्तीला सजविण्यासाठी एकूण ५१ किलो शुध्द चांदीचा वापर करण्यात आला. यापैकी ४० किलो चांदी भक्तांनी दान दिली होती तर, ११ किलो चांदी देवस्थान व्यवस्थापनाने खरेदी केली. आता पुन्हा मूर्तीच्या डोक्यावरील छत्र, मुकुट, कमरपट्टा व हार तयार करण्यात आला आहे. शुध्द चांदीपासून बनविलेल्या या आरासामुळे मूर्तींच्या गाभाऱ्याचे रूप पूर्णत: पालटले आहे. खामगाव येथील डॉ.कमल जांगिड यांच्या मार्गदर्शनात सतत ११ दिवस अहोरात्र काम करुन ही कलाकृती साकारण्यात आली. यवतमाळ येथील डॉ. सुरेंद्र भुयार व डॉ.स्रेहा भुयार या दाम्पत्यांनी पाच किलो चांदी दानात दिली. उर्वरीत चांदी भक्तांनी दान दिलेली तर काही देवस्थान प्रशासनाने खरेदी केली.
पुढील काळात मूर्तीच्या चरणाजवळ रिध्दी व सिध्दी यांच्या चांदीच्या मूर्त्यां विराजमान करण्याचा मानस आहे. यासाठी भाविकांनी दिलेल्या चांदीचा प्राधान्याने वापर केला जाणार आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, सचिव श्याम केवटे यांच्यासह देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.
शिव जटेतून गंगा अवतरण
मूर्तीच्या दोनही बाजूला देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर अतिशय मनमोहक पध्दतीने साकारण्यात आला आहे. तीन ठिकाणी कलशाची प्रतिकृती रेखाटली आहे. यासोबतच शिवजटेतून गंगा अवतरलेली दाखविण्यात आली आहे. सर्व अलंकारावर पाचफणी नाग, राष्ट्रीय पक्षी मोर व दोन्ही बाजूला गजराज साकारले आहे. यातील कलाकुरस अतिशय बारकाईने कोरण्यात आले. यातून धार्र्मिक पावित्र्य आणि महत्व विशद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Web Title: Chintamani got 72 kg of silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.