मोहदा येथे नागरिक रस्त्यावर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:27 AM2017-09-21T00:27:47+5:302017-09-21T00:28:03+5:30

सात जणांचा बळी घेणाºया वाघाचा बंदोबस्त करा, शेतकºयांना नुकसान भरपाई द्या आदी मागण्यांसाठी मंगळवारी नागरिक रस्त्यावर उतरले.

A citizen on the mahaha landed on the road | मोहदा येथे नागरिक रस्त्यावर उतरले

मोहदा येथे नागरिक रस्त्यावर उतरले

Next
ठळक मुद्देप्रशासनाविरूद्ध रोष : वाघाच्या बंदोबस्तासह नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहदा : सात जणांचा बळी घेणाºया वाघाचा बंदोबस्त करा, शेतकºयांना नुकसान भरपाई द्या आदी मागण्यांसाठी मंगळवारी नागरिक रस्त्यावर उतरले. दुपारी १२ वाजता आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दोनही बाजूला लागल्या होत्या.
राळेगाव तालुक्याच्या सखी येथील सतीश कोवे याला वाघाने ठार मारले. तो या वाघाचा सातवा बळी ठरला. यानंतरही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी रास्ता रोको केला. येथील हायवे बसस्टॉपवर माजी आमदार विजयाताई धोटे, शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. अशोक भुतडा, यशवंतराव इंगोले, अशोक पवार, मिलिंद धुर्वे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरिहर लिंगनवार, सुदाम पवार, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण कुमरे, योगेश धानोकर, वासुदेव जाधव आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. वनविभागाने या परिसरातील जंगलात केवळ पिंजरे लावले. मागील तीन दिवसात त्यांना कुठलेही यश आले नाही. प्रशासन यासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला.
पांढरकवडाचे तहसीलदार जोरवर, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.झेड. पवार, ठाणेदार ए.आय. खान आदी घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: A citizen on the mahaha landed on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.