बेचखेडच्या नागरिकांची कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:00 AM2020-03-07T06:00:00+5:302020-03-07T06:00:30+5:30

यवतमाळ तालुक्यातील बेचखेडा येथील अनुसूचित जातीचे २९, अनुसूचित जमातीचे ११७, अल्पसंख्यकांचे सात, इतर मागासवर्गीयांची १४६ घरे आहेत. मागील चार वर्षात केवळ दोन व्यक्तींना घरकूल मिळाले. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. यामुळे सतप्त नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.

Citizens of Bechkhad clash at office | बेचखेडच्या नागरिकांची कचेरीवर धडक

बेचखेडच्या नागरिकांची कचेरीवर धडक

googlenewsNext
ठळक मुद्देघरकुलाची प्रतीक्षा : चार वर्षांपासून ३०० कुटुंब प्रतीक्षेत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रधानमंत्री आवास योजनेतून दिले जाणारे घरकूल मागील चार वर्षांपासून मिळालेच नाही. यामुळे बेचखेडा येथील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली.
यवतमाळ तालुक्यातील बेचखेडा येथील अनुसूचित जातीचे २९, अनुसूचित जमातीचे ११७, अल्पसंख्यकांचे सात, इतर मागासवर्गीयांची १४६ घरे आहेत. मागील चार वर्षात केवळ दोन व्यक्तींना घरकूल मिळाले. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. यामुळे सतप्त नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.
निवेदनकर्त्यांचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सरपंच रमेश भिसनकर, उपसरपंच दत्तू गुघाने यांनी केले. यावेळी रमेश पवार, मनीषा राठोड, सुमित्रा आत्राम, मनीषा तोडसाम, सोनाली पटाडे, पांडूरंग गुघाने, रमेश पवार, भोपीदास जाधव, रामकृष्ण मेश्राम आदींसा घरकूल लाभार्थी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे ‘एसपीं’ना निवेदन
यवतमाळ : शहरातील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. या गंभीर प्रकाराला तत्काळ रोखण्याची मागणी संघटनेने केली आहे. यवतमाळ शहर आणि वाघापूर, लोहारा, पिंपळगाव, मोहा, उमरसरा या भागात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी चोरीचा छडा लावून चोरट्यांच्या मुस्क्या आवळाव्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष लक्ष्मण लोळगे, जितेश राठोड, राजेंद्र तलवारे, लक्ष्मण पाटील, धनंजय गायकवाड, शैलेश भानवे, रमेश तामगाडगे, दिनेश भवरे, प्रसन्न करमनकर, शिवदास कांबळे, गुणवंत मानकर, संतोष इटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Citizens of Bechkhad clash at office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा