पुसद शहरातील नागरिक कोरोनामुळे भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 05:00 AM2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:00:41+5:30

गढी वॉर्डातील कोरोनाबाधित ६० वर्षीय इसमाचा सोमवारी पहाटे यवतमाळ येथे मृत्यू झाला. दुसऱ्याव्यक्तीवर यवतमाळात उपचार सुरू आहे. दरम्यान कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच वसंतनगरातील कोरोना रुग्णाच्या पत्नी व मुलालाही क्वारंटईन केले आहे.

Citizens in the city of Pusad are terrified of Corona | पुसद शहरातील नागरिक कोरोनामुळे भयभीत

पुसद शहरातील नागरिक कोरोनामुळे भयभीत

Next
ठळक मुद्देसंसर्गाचा धोका : एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरातील गढी वॉर्डातील कोरोनाबाधित रुग्णाचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहे. प्रशासनाने शहराचा काही भाग पुन्हा सील केला आहे.
गढी वॉर्डातील कोरोनाबाधित ६० वर्षीय इसमाचा सोमवारी पहाटे यवतमाळ येथे मृत्यू झाला. दुसऱ्याव्यक्तीवर यवतमाळात उपचार सुरू आहे. दरम्यान कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच वसंतनगरातील कोरोना रुग्णाच्या पत्नी व मुलालाही क्वारंटईन केले आहे. आतापर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र शहरात प्रथमच कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याने पुसदकर धास्तावले आहे.
गेले अडीच महिने प्रशासनासह नागरिकांनी प्रामाणिकपणे लॉकडाऊनचे पालन केले. मात्र त्यात शिथिलता मिळताच परजिल्हा व परराज्यातून स्वगृही येणाऱ्यांची संख्या वाढल्याने तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. आता एकाचा मृत्यू झाल्याने नागरिक दहशतीत आहे. दरम्यान, वसंतनगर येथील पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या भीतीत भर पडली आहे. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे. त्यांचा शहरातील इतर नागरिकांशी संपर्क आल्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. दरम्यान, शहरातील एकूण २७ जणांना क्वारंटाईन करून पाच क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले.

लगेच फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करावी
ताप, सर्दी, खोकला आदी आढळल्यास संबंधित व्यक्तीने लगेच कोरोना केअर सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी केले. वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी फिवर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी असे त्यांनी सांगितले.

Web Title: Citizens in the city of Pusad are terrified of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.