विविध मागण्यांसाठी नागरिक तहसीलवर

By admin | Published: July 5, 2015 02:28 AM2015-07-05T02:28:59+5:302015-07-05T02:28:59+5:30

शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी शेकडो नागरिक महागाव तहसीलवर धडकले.

Citizens tahsilar for various demands | विविध मागण्यांसाठी नागरिक तहसीलवर

विविध मागण्यांसाठी नागरिक तहसीलवर

Next

महागाव तालुका : जनआंदोलन संघर्ष समितीचे नेतृत्व
महागाव : शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी शेकडो नागरिक महागाव तहसीलवर धडकले. जनआंदोलन संघर्ष समितीच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनात तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
तालुक्यातील निराधार, शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचे प्रश्न शासनदरबारी रखडले आहे. त्यात निराधारांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण रखडले आहे. शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कुणीही लक्ष देत नाही. निराधारांना तर मानधना अभावी उपाशी पोटी रहावे लागत आहे. या सर्व मागण्यांकडे लक्ष शुक्रवारी दुपारी २ वाजता शेकडो नागरिक महागाव तहसीलवर धडकले.
या मोर्चात धनोडा, खडका, लेवा परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकरांनी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर रास्त असलेल्या मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व जनआंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले. मोर्चात पंजाबराव खडकेकर, गजानन आंडगे, हनुमंतराव देशमुख, दत्तराव कदम यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. महागाव तालुक्यातील निराधारांचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. गत वर्षी तर वृद्ध, निराधारांनी तर पदयात्रेने जाऊन उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला होता, मात्र उपयोग झाला नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Citizens tahsilar for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.