‘मजीप्रा’च्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:12+5:30
चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. चापडोहच्या पाण्यावरील बहुतांश टाक्यांवरून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कामाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रकल्पामध्ये भरपूर पाणी असतानाही दहा-दहा दिवसपर्यंत पाणी मिळत नाही. विकतच्या आणि हातपंपाच्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. शिवाय या विभागातील अधिकाऱ्यांमध्येही समन्वयाचा अभाव दिसून येतो. नळ कधी येणार याचा दिवस आणि वेळेविषयीसुद्धा नक्की सांगितले जात नाही.
चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. चापडोहच्या पाण्यावरील बहुतांश टाक्यांवरून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागातील आठ दिवसांनंतरचा नवव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा या कामामुळे थांबला गेला. आठ अधिक तीन असे ११ दिवस पाणी पुरविण्याचा प्रश्न या नागरिकांपुढे आहे. सदर काम लवकरच पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगितले जात आहे.
सिंघानियानगर परिसरातील हजारो नागरिकांना हातपंप किंवा विहिरीच्या पाण्यावर आपली गरज पूर्ण करावी लागणार आहे. पिण्यासाठी त्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था न करताच कामे काढण्याची सवयच जणू या विभागाला झाली आहे. शहराला दोन प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दोनही प्रकल्पांसाठी वेगवेगळे अधिकारी, कर्मचारी आहेत. एकमेकांच्या कामाविषयी ते कुठलीही माहिती ठेवत नसल्याची बाब पुढे आली आहे. तांत्रिक कामे सांभाळणारे अधिकारीही गंभीर नसल्याचे दिसून येते. कार्यकारी अभियंत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
नळाद्वारे सांडपाणी
यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी नळाची पाईपलाईन लिकेज आहे. सांडपाणी वाहून जाण्याच्या नालीतून जुन्या लाईन गेलेल्या आहेत. लिकेज पाईपमध्ये शिरणारे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात जात आहे. शुद्ध पाण्याचा दावा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला लोकांच्या आरोग्याविषयी काही देणेघेणे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.