यवतमाळ पालिकेत पुन्हा शहर विकास आघाडी

By admin | Published: December 31, 2016 01:11 AM2016-12-31T01:11:14+5:302016-12-31T01:11:14+5:30

येथील नगरपरिषदेत भाजपा-शिवसेना युतीची चर्चा फिस्कटल्याने भाजपाने पुन्हा शहर विकास आघाडी स्थापन केली आहे.

City Development League in Yavatmal | यवतमाळ पालिकेत पुन्हा शहर विकास आघाडी

यवतमाळ पालिकेत पुन्हा शहर विकास आघाडी

Next

इच्छुकांची घालमेल : भाजपसोबत बसपा, अपक्ष
यवतमाळ : येथील नगरपरिषदेत भाजपा-शिवसेना युतीची चर्चा फिस्कटल्याने भाजपाने पुन्हा शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. यासाठी बसपा आणि अपक्षांना सोबत घेतले आहे. पुरेसे संख्याबळ असताना थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांवर अंकुश ठेवण्यासाठी ही आघाडी आकाराला आल्याचे बोलले जाते.
नगरपरिषदेत भाजपाकडे कायम बहुमत राहिले आहे. यापूर्वी भाजपाने बसपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेऊन आघाडी केली होती. मात्र लवकरच आघाडीत बिघाडी झाली. सर्वच पक्षातील नगरसेवकांचे गट पडले होते. त्याचे परिणामही पाच वर्ष यवतमाळकरांनी अनुभवले. आता नगरपरिषदेत भाजपाला २९ सदस्यांसह स्पष्ट बहुमत आहे. शिवसेनेला डावलून शहर विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीचा गटनेता म्हणून नितीन गिरी यांची तर भाजपा सभागृहातील गटनेता म्हणून शहराध्यक्ष विजय खडसे यांची निवड करण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)

स्वीकृतची प्रथा मोडित निघेल का ?
नगरपरिषद सभागृहात अनुभवी आणि शहर विकासाला चालना देऊ शकेल अशा प्रशासनातील सेवानिवृत्त व्यक्तीला स्वीकृत सदस्य म्हणून घेणे अपेक्षित आहे. यामध्ये निवृत्त प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, अभियंता, डॉक्टर, वकील या पैकी एकाची निवड होणे अपेक्षित असते. परंतु आजपर्यंत राजकीय पुनर्वसनासाठी या पैकी कुणालाही संधी मिळाली नाही. केवळ कंत्राटदार, राजकीय पदाधिकारी यांनाच संधी मिळाली. यावेळेस ही प्रथा मोडित निघावी, अशी अपेक्षा नगरपरिषद वर्तुळात व्यक्त होत आहे.
 

Web Title: City Development League in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.