‘सीओ’कडून शहर विद्रूपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:19 PM2018-01-30T23:19:33+5:302018-01-30T23:21:05+5:30

शहरात फलकबाजीला उत आला असून यात चक्क नगरपरिषद प्रशासनच आघाडीवर आहे. शहर स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावताना आपणच शहराच्या सौंदर्याची ऐसीतैसी करतोय याचे भान पालिका प्रशासनाला राहिले नाही.

City insolvency from 'CO' | ‘सीओ’कडून शहर विद्रूपीकरण

‘सीओ’कडून शहर विद्रूपीकरण

Next
ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : फलकबाजीला उत आल्याने नगरसेवकाची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात फलकबाजीला उत आला असून यात चक्क नगरपरिषद प्रशासनच आघाडीवर आहे. शहर स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावताना आपणच शहराच्या सौंदर्याची ऐसीतैसी करतोय याचे भान पालिका प्रशासनाला राहिले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाची तसेच शहर विद्रूपीकरण कायद्याचे नगरपरिषद मुख्याधिकारीच उल्लंघन करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.
गल्लीबोळीतील टिनपाट नेतेमंडळी गावात न केलेल्या कामांचेही मोठमोठे फलक लावतात. या फलकबाजीमुळे शहरातील प्रमुख चौकांची स्थिती अतिशय बकाल झाली आहे. नगरपरिषदेने याहीपुढे एक पाऊल टाकत एकही पथदिव्याचा खांब फलक लावण्यावाचून सोडलेला नाही. पालिका प्रशासनच कायद्याची पायमल्ली करत असल्याचे पाहून फ्लेक्स व नेत्यांना चांगलाच जोर चढला.
नगरपरिषद कार्यालयासमोरच अवाढव्य असे फ्लेक्स लावले आहे. पथदिव्याला समांतर असे फलक लावल्यामुळे तिथे अपघाताची स्थिती निर्माण झाली होती. पालिका पदाधिकाºयाचे हे फलक काढल्यानंतर दुसºयाच एका पक्षातील पदाधिकाºयाचे फलक लागले. सुरू असलेल्या फलकबाजीवरून निवडणुकांचे वेध लागल्याचे स्पष्ट होत आहे. कामापेक्षा आपल्या फलकावरील फोटोची उंची किती वाढविता येते याची स्पर्धा सुरू आहे. या फलकबाजीला नगरपरिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरेच खतपाणी घालत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवकाने जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली असून मुख्याधिकारी ढेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाची अवमानना केली आहे.
ज्यांनी शहर विद्रूपीकरण कायद्याची अंमलबजावणी करावी तीच व्यक्ती उल्लंघन करत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

Web Title: City insolvency from 'CO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.