पांढरकवडात दोन गटांत हाणामारी

By admin | Published: June 1, 2016 12:05 AM2016-06-01T00:05:54+5:302016-06-01T00:05:54+5:30

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत झाले. यात दोन जण गंभीर जखमी झाले.

Clashes in two groups in white belt | पांढरकवडात दोन गटांत हाणामारी

पांढरकवडात दोन गटांत हाणामारी

Next

पोलीस उपनिरीक्षक जखमी : क्षुल्लक वाद, महिलेसह दोन गंभीर
पांढरकवडा : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत झाले. यात दोन जण गंभीर जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकाला लोखंडी रॉड लागल्याने जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री शहरातील इंदिरानगर परिसरात घडली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली.
शोभा महादेव तेलंग (३८), मकबुल आणि पोलीस उपनिरीक्षक संजीव खंडारे यात जखमी झाले आहे. शोभाची प्रकृती गंभीर असल्याने तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तर मकबुलवर पांढरकवडा येथे उपचार सुरू आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन गटांत क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. हा प्रकार पांढरकवडा पोलिसांना माहीत होताच पोलीस उपनिरीक्षक संजीव खंडारे घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणत असताना लोखंडी रॉड लागल्याने ते जखमी झाले. या हाणामारीमुळे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.पोलिसांनी काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आणली. गर्दीचा फायदा घेत आरोपींनी तेथून पळ काढला.
या प्रकरणी शोभा तेलंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून मकबुल, वसीम, मोहसीन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला तर मकबुलच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून प्रदीप, निकेश, रामा, बाल्या, गोल्या व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस निरीक्षक संजीव खंडारे यांच्या तक्रारीवरून मकबुल, वसीम, मोहसीन, प्रदीप, नीकेश, रामा, लक्ष्मण, गोल्या, बाल्या आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती पूर्णत: नियंत्रित आहे. या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Clashes in two groups in white belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.