गणिताचा पेपर सोडविताना दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 03:32 PM2023-01-24T15:32:28+5:302023-01-24T15:33:19+5:30

शाळेत सराव परीक्षा सुरू असतानाची घटना

Class 10 student dies while solving maths paper in yavatmal | गणिताचा पेपर सोडविताना दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

गणिताचा पेपर सोडविताना दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

googlenewsNext

बाभूळगाव (यवतमाळ) : गणित विषयाचा पेपर सोडविताना दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बाभूळगाव येथे घडली. प्रतीक गजानन थोटे (१६, रा. सरूळ) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बेशुद्ध होऊन तो अचानक खाली कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

बाभूळगाव येथील प्रताप विद्यालयाचा तो विद्यार्थी होता. या विद्यालयात दहाव्या वर्गाची सराव परीक्षा घेतली जात आहे. सोमवारी गणित विषयाचा पेपर होता. पेपर सोडवत असताना प्रतीक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. यामुळए काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी त्याला बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्रतीक हा खो-खो खेळाचा उत्कृष्ट खेळाडू होता. त्याची आई अर्चना थोटे या सरूळ ग्रामपंचायतीच्या सदस्य, तर वडील शेतकरी आहेत. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ व आप्त परिवार आहे.

Web Title: Class 10 student dies while solving maths paper in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.