सफाई कामगारांना कामावरून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:00 AM2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:29+5:30
कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इतर ठिकाणी काम मागण्यासाठी गेल्यास कुणी कामही देत नसल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. अचानक कंत्राट बदलल्यामुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यांनी कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना सादर करून परवानगी मागितली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील नगरपरिषदेमध्ये गत १२ वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून बंद करण्यात आले. त्यामुळे या कामगारांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इतर ठिकाणी काम मागण्यासाठी गेल्यास कुणी कामही देत नसल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. अचानक कंत्राट बदलल्यामुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यांनी कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना सादर करून परवानगी मागितली आहे. ६ जानेवारीपूर्वीचे कंत्राट संपुष्टात आल्याचे त्यांना लेखी कळविण्यात आले. परंतु ७ जानेवारीपासून नवीन कंत्राट कोणत्या ठेकेदाराला मिळाले, हे कळविण्यात आले नाही. त्यामुळे काम करावे किंवा नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. काम मिळेल किंवा नाही, अशाही संभ्रमात हे कामगार आहेत. हे कामगार अनेक वर्षांपासून सफाईचे काम करित असल्यामुळे याशिवाय दुसरे कोणतेही काम त्यांना मिळणे शक्य नसल्याने त्यांना सफाईचे काम मिळावे व किमान वेतनानुसार वेतन मिळावे, वेतन बँक खात्यात जमा करावे, भविष्य निर्वाह निधी नियमानुसार कपात करून भरण्यात यावा, शासन निर्णयानुसार सर्व सोयीसुविधांचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी कामगारांनी कामबंद आंदोलन केले.