शहर स्वच्छतेचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:24 PM2019-05-15T22:24:42+5:302019-05-15T22:24:57+5:30

नगरपरिषदेचे आर्थिक घडी विस्कटलेली आहे. सातत्याने वेतनातील समस्या निर्माण होत असून सफाईचे काम ठप्प होत आहे. आता मान्सूनपूर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. दीड महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने रोजंदारी सफाई कर्मचारी संपावर आहेत.

Cleanliness of the city | शहर स्वच्छतेचे काम ठप्प

शहर स्वच्छतेचे काम ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : वेतनासाठी सफाई कामगारांचे कामबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेचे आर्थिक घडी विस्कटलेली आहे. सातत्याने वेतनातील समस्या निर्माण होत असून सफाईचे काम ठप्प होत आहे. आता मान्सूनपूर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. दीड महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने रोजंदारी सफाई कर्मचारी संपावर आहेत. तर डिझेल नसल्याने अ‍ॅपे व ट्रॅक्टर सारखी वाहने उभी आहे.
स्वच्छतेसाठी प्रत्येक प्रभागात सहा कुली (रोजंदारी सफाई कामगार) देण्यात आले आहे. यांच्याच भरवश्यावर शहराच्या स्वच्छतेची दारोमदार आहे. कंत्राटदार या कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देत नाही. त्यांच्या कुठल्याही कामगार म्हणून मिळालेल्या कायदेशीर हक्काचे संवर्धन केले जात नाही. धोकादायक स्थितीत काम करुनही सफाई कर्मचारी कायम उपेक्षित आहे. यांच्या आरोग्याबाबतही दक्षता घेतली जात नाही. अशाही स्थितीत जीवावर उदार होऊन शहराचे आरोग्य राखणाºया रोजंदारी सफाई कामगारांना वेळेत वेतन दिले जात नाही. दीड महिन्यांपासून वेतन नसतानाही या कामगारांना राबवून घेतले जात आहे. अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला. वेतन नसेल तर काम नाही, अशी भूमिका सफाई कामगारांनी घेतली. त्यामुळे संपूर्ण शहरातील स्वच्छतेचे काम रखडले आहे. अनेक ठिकाणी कचºयाचे ढिग लागले आहे. नाल्या तुंबल्या आहेत. याचा फटका यवतमाळकरांना बसत आहे. या समस्येचा लवकरात लवकर निपटारा करा, असे निर्देश मुख्याधिकारी यांनी आरोग्य विभाग प्रमुखाला दिले आहेत. हा प्रश्न मार्गी लागण्याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
डिझेलअभावी वाहने उभीच
शहरातील दाटीवाटीने असलेल्या वस्त्यांमधून कचरा संकलन करण्यासाठी तीनचाकी अ‍ॅपे खरेदी केले. असे २८ अ‍ॅपे कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र याचेही मागील पाच महिन्यांपासून बिल काढण्यात आले नाही. ट्रॅक्टरच्याही डिझेलचा प्रश्न आहे. यामुळे ही वाहने तशीच उभी आहे. अरुंद भागातून कचरा उचलण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा ठप्प पडल्याने स्लममध्ये कचºयाची बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Cleanliness of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.