पुसदमधील दोन कोविड सेंटर तत्काळ बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:44 AM2021-05-27T04:44:14+5:302021-05-27T04:44:14+5:30
येथील टिळकनगर व तलाव ले-आउटमध्ये दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यासाठी दोन्ही हॉस्पिटलच्या संचालकांनी नागरिकांची पूर्वपरवानगी घेतली ...
येथील टिळकनगर व तलाव ले-आउटमध्ये दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यासाठी दोन्ही हॉस्पिटलच्या संचालकांनी नागरिकांची पूर्वपरवानगी घेतली नाही. पॉझिटिव्ह रुग्णांसोबत असलेले नातेवाईक खर्रा, तंबाखू खाऊन कुठेही थुंकतात. त्यांच्या तोंडाला मास्क नसतो. त्यामुळे या भागात कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास वाव आहे. रुग्णांची वाहने रस्त्यावर उभी राहून वाहतुकीची कोंडी होते. वाहनचालकांना हटकल्यास वाद व भांडणे होतात. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहे.
या वस्तीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक हृदयविकाराने आजारी आहे. आता कोविड सेंटरमुळे परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांचा वावर वाढला आहे. त्यामुळे राहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दोन्ही कोविड सेंटर तत्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा कोरोना महामारीचा फैलाव होऊन जर स्थानिकांच्या जीवित्वास हानी झाली, तर त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदनावर माजी आमदार विजयराव पाटील-चोंढीकर, वाय.ए. सूर्यवंशी, सिराज हिराणी, अनिरुद्ध पाटील-चोंढीकर, गिरीश जयपुरिया, प्रभाकर देशमुख, बालकिसन भांगडे,
दिलीप इनानी, ॲड. झेड.ओ. भंडारी, ॲड. बी.बी. जिल्हेवार, संध्या खोडके, अलका खोडके, प्रवीण जोगी, ए.पी. पुंडे, भगवान आसोले, रणजित आसोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.