आर्णी व जवळा येथे बंद

By admin | Published: January 15, 2015 10:59 PM2015-01-15T22:59:06+5:302015-01-15T22:59:06+5:30

तालुक्यातील जवळा येथे झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबन प्रकरणी आर्णी, जवळा आणि महागाव कसबा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर दिग्रस येथे मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला.

Closed at Arni and Jawla | आर्णी व जवळा येथे बंद

आर्णी व जवळा येथे बंद

Next

घटनेचा निषेध : दिग्रस येथे मोर्चा, महागाव तहसीलदारांना निवेदन
आर्णी : तालुक्यातील जवळा येथे झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबन प्रकरणी आर्णी, जवळा आणि महागाव कसबा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर दिग्रस येथे मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला.
जवळा येथील घटनेच्या निषेधार्थ आर्णी येथील व्यापारपेठ सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून नागरिकांचा एक मोर्चा आर्णी तहसील कार्यालयावर पोहोचला. त्यावेळी आरोपींना त्वरित अटक करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी एन.डी. मनवर, अविनाश घाटे, सुधाकर कांबळे, दिलीप मनवर, रंजिता शिंदे, गणेश हिरोळे, संजय सुखदेवे यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. मोर्चात सुनील भगत, वसंत नगराळे, भारत काळपांडे, प्रदीप गायकवाड, दत्तराव भरणे यांच्यासह शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले होते.
यानंतर आर्णी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान जवळा येथील घटनेचा आर्णी तालुका भाजपाच्यावतीने निषेध करून आरोपीच्या अटकेची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना दिले. या निवेदनावर अनिल इंगोले, नरेंद्र देशमुख, सुमित छाजेड, भाऊसाहेब अत्रे, गजानन ठाकरे, सुरेश चिल्लरवार, लक्ष्मण परळीकर, जुनेद अली काजी, रुपेश टाक यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर जवळा येथे बुधवारी रात्री आमदार राजू तोडसाम यांनी भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
तर महागाव येथे घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. निवेदन देताना माणिक मुनेश्वर, धम्मानंद कावळे, राहुल तायवाडे, प्रकाश डांगे, विष्णू चवरे, नितीन वाहुळे, प्रमोद बरडे उपस्थित होते. तर महागाव कसबा येथे जवळा घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. लाडखेड ठाणेदाराला निवेदन देऊन आरोपीच्या अटकेची मागणी करण्यात आली. यावेळी किशोर बिहाडे, सुभाष बिहाडे, संजय देशपांडे, छोटू ठेकेदार, सुभाष राणे, विजय बिराडे, किशोर काकस आदी उपस्थित होते. (लोकमत चमू)

Web Title: Closed at Arni and Jawla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.