‘प्रियदर्शिनी’साठी ‘सीएम’ने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 11:23 PM2018-09-16T23:23:56+5:302018-09-16T23:25:06+5:30

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सहकारावर आधारित एकमेव प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सूत गिरणीचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.

CM for 'Priyadarshini' should take the initiative | ‘प्रियदर्शिनी’साठी ‘सीएम’ने पुढाकार घ्यावा

‘प्रियदर्शिनी’साठी ‘सीएम’ने पुढाकार घ्यावा

googlenewsNext
ठळक मुद्देविजय दर्डा : सूत गिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सहकारावर आधारित एकमेव प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सूत गिरणीचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीची २७ वी आमसभा रविवारी येथे अँग्लो हिंदी हायस्कूलमध्ये पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना विजय दर्डा म्हणाले, शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. ५० हजाराच्या पीककर्जासाठी बँका शेतकºयांना फिरवितात, उंबरठे झिजवायला लावतात, तर दुसरीकडे अनेक बड्या कंपन्यांकडे बँकांची एक लाख कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी आहे. हा विसंगत कारभार न उलगडण्यासारखा आहे. सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी बँक आॅफ इंडियाशी बोलणी सुरू आहे. मंत्री, मुख्यसचिव यांच्या स्तरावरही पाठपुरावा केला जात आहे. आता खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच यात पुढाकार घेऊन प्रियदर्शिनी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे आणि आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा द्यावा, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमापूजनाने सूत गिरणीच्या आमसभेला प्रारंभ झाला. व्यासपीठावर सूत गिरणीचे संचालक माणिकराव भोयर, बाळासाहेब मांगुळकर, किशोर दर्डा, राजीव निलावार, डॉ. प्रताप तारक, कैलास सुलभेवार, डॉ. जाफरअली जीवाणी, प्रकाशचंद छाजेड, लीलाबाई बोथरा, सुधाकरराव बेलोरकर, डॉ. अनिल पालतेवार, संजय पांडे, जयानंद खडसे, उज्ज्वला अटल आदी उपस्थित होते.
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सूत गिरणीचे दिवंगत संचालक संतोष भूत यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सूत गिरणीचे उपाध्यक्ष कीर्ती गांधी यांनी सांगितले की, बँक आॅफ इंडियाला उचललेल्या कर्जापेक्षा कितीतरी अधिक रक्कम व्याजापोटी दिली गेली आहे.
या व्याजचक्राने सूत गिरणीचे कंबरडे मोडले आहे. परंतु त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास सुतगिरणी पुन्हा सुरू होईल, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.

Web Title: CM for 'Priyadarshini' should take the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.