उपनिबंधक संस्थेतर्फे सहकार परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:22 PM2017-10-29T22:22:26+5:302017-10-29T22:22:42+5:30
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवाहरलाल दर्डा श्रोतगृहात रविवारी सहकार परिषद घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवाहरलाल दर्डा श्रोतगृहात रविवारी सहकार परिषद घेण्यात आली.
सहकाराच्या क्षेत्रात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे योगदान मोठे आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार घेऊन सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी यावेळी केले. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सरेगावकर, सहकारी बँकेचे संचालक नितीन खर्चे, सहकार भारतीचे अध्यक्ष अमित भिसे, सुदर्शन भालेराव, जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, उपनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.
तूर खरेदीला प्रथमच सरकारने मुदतवाढ दिली आहे. उडीद, मूग, कापूस, सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी करायची आहे. मोबाईलवर मॅसेज आल्यानंतरच शेतकºयांनी आपला माल खरेदीसाठी आणणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकºयांना खरेदीसाठी ताटकळत बसावे लागणार नाही, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी यावेळी सांगितले.