कोळशाच्या लुटीत कुणाचे हात काळे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:54 PM2019-02-01T23:54:43+5:302019-02-01T23:55:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगतच्या पैनगंगा खाणीतून शस्त्राच्या धाकावर कोळशाची लूट करण्यात आल्याच्या प्रकरणाचे तार वणीशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगतच्या पैनगंगा खाणीतून शस्त्राच्या धाकावर कोळशाची लूट करण्यात आल्याच्या प्रकरणाचे तार वणीशी जुळले असून संबंधित कोळसा खरेदी करणाऱ्या व्यापाºयाच्या शोधात चंद्रपूर पोलीस वणीत येरझारा घालत आहेत. अद्याप सदर व्यापारी पोलिसांच्या हाती लागला नसून या लुटीत वणीतील आणखी काही व्यापाºयांचा हात आहे का, हेदेखील पोलीस यंत्रणेकडून चाचपून पाहिले जात आहे.
पैनगंगा कोळसा खाणीतून कोळसा चोरायचा आणि तो थेट वणी येथील लालपुलिया भागात आणून विकायचा, असे सत्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कोळशाच्या या काळ्या धंद्यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या साºया प्रकरणात वेकोलिचे कर्मचारीदेखील सहभागी असल्याची बाब पोलीस चौकशीत उघड झाली आहे.
पैनगंगा कोळसा खाणीत शस्त्राच्या धाकावर कोळसा लुटून नेल्याच्या घटनेनंतर या चोरीचे तार वणीत असल्याची कुणकुण लागताच, चंद्रपूर पोलिसांचे एक पथक मागील आठवडाभरापासून वणी येथे चौकशीसाठी फेºया मारत आहे.
येथून पोलिसांनी काही लोकांना अटकही केली आहे. या प्रकरणात वणीतील आणखी काही व्यापाºयांचा सहभाग आहे का, याचीदेखील पोलीस चौकशी करीत आहे. चोरलेला कोळसा कोण खरेदी करीत होता. खरेदी केलेला हा कोळशाची नंतर कोणत्या व्यापाºयाच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जायची, हा पोलिसांच्या चौकशीचा भाग ठरला आहे.
दरम्यान, चोरीचा कोळसा खरेदी करणाºया व्यापाºयाचे नाव उघड झाले असून त्याला अटक करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांचे पथक वणी परिसरात फिरत आहे. मात्र सध्या सदर व्यापारी वणीतून भूमिगत झाल्याची चर्चा असून त्यामुळे चंद्रपूर पोलिसांना आल्यापावली परत जावे लागत आहे. सदर व्यापाºयाचे ‘लोकेशन’ शोधण्याचे काम सध्या पोलीस यंत्रणा करीत आहे.
वणी तालुक्यातून पोलिसांनी सहाजणांना उचलले
गडचांदूर येथील पैनगंगा कोळसा खाणीतून शस्त्राच्या धाकावर कोळसा लुटून नेल्याप्रकरणीत चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंत वणी तालुक्यातून सहाजणांना अटक केली आहे. अरुण मुरलीधर कणसे (रा.कैलासनगर), राकेश तेजराम बोधनकर (रा.कैलासनगर), संजय पांडुरंग भुसारी (रा.राजूर), गजानन कुत्तरमारे (रा.निंबाळा), राकेश मस्की (रा.झरपट), अनंता तुकाराम मस्की (रा.झरपट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.