वणी तालुक्यातील कोळसा खाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:16+5:30

या आंदोलनात पाच प्रमुख कामगार संघटना व सहयोगी तीन संघटना सहभागी झाल्या आहेत. शनिवारपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व उद्योग बंद असताना विजेची कमतरता पडू नये म्हणून कामगारांनी जीव धोक्यात टाकून देशाची विजेची गरज पूर्ण केली. मात्र शासनाने लॉकडाऊनची संधी साधून २० ते ३० फुटावर असलेले कोळसा पट्टे ४३ विदेशी व देशी उद्योगपतींना विकण्यासाठी काढले.

Coal mines in Wani taluka closed | वणी तालुक्यातील कोळसा खाणी बंद

वणी तालुक्यातील कोळसा खाणी बंद

Next
ठळक मुद्देकामगारांचे आंदोलन : वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान, खाण परिसरात शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वेकोली कोळसा खाणींच्या खासगीकरणाविरोधात मुख्य कामगार संघटनानी तीन दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील सर्वच कोळसा खाणी गुरूवारी बंद होत्या. परिणामी खाण परिसरात शुकशुकाट दिसून आला. यामुळे पहिल्याच दिवशी वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान झाले.
या आंदोलनात पाच प्रमुख कामगार संघटना व सहयोगी तीन संघटना सहभागी झाल्या आहेत. शनिवारपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व उद्योग बंद असताना विजेची कमतरता पडू नये म्हणून कामगारांनी जीव धोक्यात टाकून देशाची विजेची गरज पूर्ण केली. मात्र शासनाने लॉकडाऊनची संधी साधून २० ते ३० फुटावर असलेले कोळसा पट्टे ४३ विदेशी व देशी उद्योगपतींना विकण्यासाठी काढले. त्यामुळे वेकोलिकडे खोलवर असलेल्या कोळसा पट्ट्यामधून कोळसा काढण्यासाठी जास्त ताकद वापरावी लागेल व त्यामुळे वेकोलिचा महाग कोळसा कुणी घेणार नाही, असा शासनाचा डाव होता. या धोरणाविरोधात भारतीय मजदूर संघ, इंटक, एचएमएस, सीटू, आयटक तथा सहयोगी सीस्टा, एसटीएनसी काऊन्सील, ईनमोसा या संघटनांच्या कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला. गुरूवारी तालुक्यातील उकणी खाणीमध्ये स्फोट करणारे ४० ट्रक अडकून होते. कोलार पिंपरी, घोन्सा, जुनाड खाणीतही हीच स्थिती होती. वणीच्या रेल्वे सायडींगवर रेल्वे रॅक कोळसा भरण्यासाठी उभी होती. वेकोलिच्या मुंगोली, निलजई, उकणी, घोन्सा, भांदेवाडा, कोलार, जुनाड, जीएम कार्यालय, रेल्वे सायडींगवर कामगार न आल्याने वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान झाले. आंदोलनाचे नेतृत्व सैय्यद सरफराज, शंकर येडलावार, अरूण सींग, दिलीप खाडे, सुनील मोहितकर, अशोक मेठे, हरिजन ओंकारनाथ, दिलीप कोटरंगे यांनी केले.

Web Title: Coal mines in Wani taluka closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप