भारत सेवा आखाडा येथे नारळी कुस्त्या
By Admin | Published: August 22, 2016 01:09 AM2016-08-22T01:09:38+5:302016-08-22T01:09:38+5:30
शहरातील माळीपुरा चमेडिया नगर परिसरातील भारत सेवा आखाड्याच्या मैदानात नारळी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला.
१३० मल्लांचा सहभाग : मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान
यवतमाळ : शहरातील माळीपुरा चमेडिया नगर परिसरातील भारत सेवा आखाड्याच्या मैदानात नारळी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला.
कुस्त्याच्या सामन्यात परिसरातील लहान मोठे पहेलवान, तसेच बारेगाव, मादणी येथील एकंदर ५० मल्लांनी भाग घेतला. या दंगलीमध्ये मोठ्या कुस्तीत अनुराग राठोड पहेलवानसोबत अजहर पठाण पहेलवान, राहुल दाणीसोबत श्रीधर मडावी, गणेश मेश्रामसोबत अतुल पहेलवान, शेख अफताबसोबत दर्शन दोडके पहेलवान यांच्यात सामना झाला. या कुस्त्यांची काट्याची लढत झाली. विजयी पहेलवानांना रोख पारितोषिके व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. लहान कुस्त्यांमध्ये अविनाश पवार, साईल खान, शेख समीर, शेख सरफराज खान, रेहानखान, उमेश पवार, प्रतिक पोयाम, रोहीत बोरुले असे ८० पहेलवानांनी भाग घेतला. कुस्त्यांची परंपरा जोपासली जावी व भारत सेवा आखाडा दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करते. अध्यक्षस्थानी विलास राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गजानन इंगोले, अशोक जयस्वाल होते. रहेमान देशमुख, गजानन भोयर या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. पंच म्हणून गजानन उजवणे, जितूभाऊ बन्नावडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजेंद्र वाघ यांनी केले. यशस्वितेकरिता मोहीद्दीन पहेलवान, दिलीप गडमडे पहेलवान, धनंजय गायकवाड, मोहीत घायगोडे, रुपेश नारनवरे, अशोक भुरसे, अक्षय मोरवाल, सूरज प्रजापती, श्रीधर मडावी आदींनी सहकार्य केले.
(स्थानिक प्रतिनिधी)