‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला थंड प्रतिसाद

By admin | Published: March 27, 2016 02:25 AM2016-03-27T02:25:40+5:302016-03-27T02:25:40+5:30

यवतमाळ जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला पहिल्या पंधरवड्यात थंड प्रतिसाद मिळाला आहे.

The cold response to the 'Come to Land' scheme | ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला थंड प्रतिसाद

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला थंड प्रतिसाद

Next

१५ दिवसांत केवळ ८३७ अर्ज : बहुतांश शेतकरी योजनेपासून अनभिज्ञ
राळेगाव : यवतमाळ जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला पहिल्या पंधरवड्यात थंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत केवळ ८३७ अर्ज दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांचे अर्ज १४ एप्रिलपर्यंत स्वीकारले जाणार असले तरी आजचा प्रतिसाद पाहता पुढेही अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, याविषयी साशंकता आहे. शेततळ्यासाठी प्रतिसाद न मिळण्यास विविध कारणे सांगितली जात आहे.
प्रगत जिल्ह्यात सदर योजनेंतर्गत उद्दिष्टाच्या तब्बल पाचपट प्रतिसाद पहिल्या पंधरवड्यात मिळाला. सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळाने सतत होरपळणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात केविलवाणा प्रतिसाद आहे. इतका अल्प प्रतिसाद का राहिला याची कारणे शोधून उर्वरित दिवसात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे यासाठी शासकीयस्तरावर जोरदार प्रयत्नाची गरज व्यक्त केली जात आहे.
भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे, सधन जिल्हे असलेल्या आणि इंटरनेटचा वापर सर्वाधिक असलेल्या नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टापैकी अनुक्रमे १२ हजार २३२ आणि दहा हजार ३२९ शेतकऱ्यांचे अर्ज १५ दिवसात दाखल झाले आहेत. ते उद्दिष्टाच्या तुलनेत आजच पाचपट अधिक झाले आहे. नाशिकला दोन हजार ५०४, तर अहमदनगरला दोन हजार ३९२ शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. मुदत संपेपर्यंत अधिक मागणी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या, लोकसंख्येच्यादृष्टीने मोठा आहे. शेतकरी संख्याही फार मोठी आहे. पण अर्ज मात्र ८३७ आले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नाही. योजनेचा प्रसार, प्रचार करण्यास कृषी विभाग कमी पडला आहे. त्यानंतर अर्ज आॅनलाईन भरायचे आहेत. अनेक ठिकाणी ही सुविधा नसल्याने, शासकीय पातळीवर याबाबत सहकार्याची कमतरता राहत असल्यानेही आकडा अल्प राहिला आहे.
शेतकऱ्यासाठी जवळपास ५० हजार रुपये शेतकऱ्याला प्रथम स्वत:जवळचे गुंतवायचे आहे. सद्यस्थितीत होरपळलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती त्यात गुंतवणूक करण्याची नाही. बँकांचे कृषी कर्ज, वीज पंपाचे बिल चुकविण्याला त्यांची प्राथमिकता राहिली आहे. या व इतर कारणांमुळेही जिल्ह्यात शेततळ्यांसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे सांगितले जाते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The cold response to the 'Come to Land' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.