उंदरणी येथे सामूहिक वन बीज टोकणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:26 AM2021-07-22T04:26:08+5:302021-07-22T04:26:08+5:30
बीज टोकणी कार्यक्रमाला सरपंच भगवान मेश्राम, उपसरपंच सुनीता ठाकरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महादेव ठाकरे, ज्ञानेश्वर सलाम, संतोष उईके, ...
बीज टोकणी कार्यक्रमाला सरपंच भगवान मेश्राम, उपसरपंच सुनीता ठाकरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महादेव ठाकरे, ज्ञानेश्वर सलाम, संतोष उईके, सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती सचिव अनिल पुसनाके, सूरज पुसनाके, रामेश्वर तोडसाम, मोहन जाधव, आदी उपस्थित होते.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट संस्थेद्वारे एप्रिल २०२० पासून घाटंजी व केळापूर या दोन्ही तालुक्यातील एकूण २० निवडक सामूहिक वनहक्क प्राप्त गावांमध्ये शाश्वत उपजीविका व पर्यावरण सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. उंदरणी येथे एकूण ९१६.४१ हेक्टर क्षेत्र सामूहिक वनहक्क म्हणून प्राप्त आहे. हे गाव पेसा ग्रामपंचायत आहे. जंगलाचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापनाकरिता ग्रामसभा सदस्य पुढाकार घेत आहे. ग्रामसभा उंदरणीअंतर्गत सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती स्थापन झाली आहे. कायद्याला अनुसरून सामूहिक वनहक्क क्षेत्राचे सनियंत्रण सामूहिक वनहक्क व्यवस्थान समितीद्वारे केले जात आहे.
बॉक्स
वन बीज टोकणीची सुरुवात करण्यापूर्वी प्रकल्प क्षेत्र समन्वयक मोहन जाधव यांनी संस्थेच्या कार्याची व प्रकल्प उपक्रमाची माहिती दिली. टोकणीचा उद्देश स्पष्ट केला. तसेच पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. सामूहिक वन हक्क मिळालेल्या गावातील लोकांनी आपल्या जंगलाचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सूरज पुसनाके यांनी आभार मानले.