संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:55 PM2019-01-30T23:55:53+5:302019-01-30T23:57:08+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाद्वारे घेण्यात आला. येथील बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित या कार्यक्रमात विधानसभेचे माजी उपसभापती प्रा.वसंत पुरके यांनी उद्देशिका वाचन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाद्वारे घेण्यात आला. येथील बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित या कार्यक्रमात विधानसभेचे माजी उपसभापती प्रा.वसंत पुरके यांनी उद्देशिका वाचन केले.
भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी ९० दिवसाचा विविध जनजागृती कार्यक्रम आखून दिला आहे. याचाच एक भाग म्हणून अनुसूचित जाती विभागाचे महाराष्टÑ अध्यक्ष राजू वाघमारे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्टÑात उपक्रम राबविले जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्देशिका वाचन केले.
यावेळी विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, जीवन पाटील, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माधुरीताई अराठे, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष सुनील भेले, ओबीसी विभाग अध्यक्ष नितीन जाधव, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जाफर खान, जिल्हा युवक अध्यक्ष अतुल राऊत, एनएसयुआय जिल्हा अध्यक्ष कौतुक शिर्के, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, सिकंदर शाह, अरूण राऊत, अरविंद वाढोणकर, दिनेश मोगरकर, उमेश इंगळे, पराग पिसे, सुनील बनसोड, घनश्याम अत्रे, अरूण ठाकूर, संदीप तेलगोटे, प्राजक्त तेलगोटे, अनिल चंदन, पारस अराठे, लिलाधर कांबळे, प्रमोदिनी रामटेके, पंडित काकरे, आनंद भगत, ब्राह्मणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी यवतमाळ शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष दत्ता हाडके, अनिल चावरे, जीवन शेळके, राहुल सवाई आदींनी पुढाकार घेतला.