महाविद्यालयांचे नॅकव्दारे मूल्यांकन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:44 AM2021-08-23T04:44:11+5:302021-08-23T04:44:11+5:30

फोटो दारव्हा : गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयांनी नॅकव्दारे मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे मत नॅकचे प्रतिनिधी व शेगाव येथील माऊली ग्रुप ...

Colleges require NAC assessment | महाविद्यालयांचे नॅकव्दारे मूल्यांकन आवश्यक

महाविद्यालयांचे नॅकव्दारे मूल्यांकन आवश्यक

Next

फोटो

दारव्हा : गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयांनी नॅकव्दारे मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे मत नॅकचे प्रतिनिधी व शेगाव येथील माऊली ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.सी.एम. जाधव यांनी व्यक्त केले.

येथे आय.क्यू.ए.सी. मुंगसाजी महाराज महाविद्यालय, एच.आर.डी.सी. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ आणि फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने पाच दिवसीय वर्च्युअल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑन नॅक रिवाईज असेसमेंट अँड अँक्रिडिटेशन फ्रेमवर्क या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ.एस.व्ही. घुईखेडकर होत्या. डॉ. पीयुष पहाडे, डॉ. हेमंत चांडक, डॉ. भारत कानगुडे, अनंतराव पवार, डॉ. अयुब शेख, डॉ. दीपक ननावरे, डॉ. गौरी देवस्थळे यांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास राऊत होते. मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय मानोराचे प्राचार्य डॉ. एन.एस. ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध राज्यातील जवळपास १५० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. सुनील चकवे, डॉ. प्रशांत बागेश्वर, डॉ. अमोल वाकोडे, प्रा. नाझीया राशिदी, डॉ. अख्तरउन्नीसा कुरेशी, प्रा. सुनील डंभारे, प्रा.भागवत, प्रा. नाशीत खान, प्रा. नेहा माहुरकर, प्रा. प्रियंका रुईकर, इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Colleges require NAC assessment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.