दिग्रसमध्ये बालमजुरांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:40 PM2017-12-28T23:40:27+5:302017-12-28T23:40:39+5:30

१४ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात कामाला ठेवणे व त्यांच्याकडून हलके अथवा जड कामे करून घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र बाजारपेठेत सर्रास बालकांकडून लहान-मोठी कामे करवून घेतली जात आहे.

Common use of child labor in Digras | दिग्रसमध्ये बालमजुरांचा सर्रास वापर

दिग्रसमध्ये बालमजुरांचा सर्रास वापर

Next
ठळक मुद्देसंबंधित विभागाचे दुर्लक्ष : गुमास्ता नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : १४ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात कामाला ठेवणे व त्यांच्याकडून हलके अथवा जड कामे करून घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र बाजारपेठेत सर्रास बालकांकडून लहान-मोठी कामे करवून घेतली जात आहे. प्रशासनासमोर लहान मुले काम करतांना दिसत असताना देखील कारवाई होत नाही. तर व्यापारी गुमास्ता नियमाचा देखील उल्लंघन करीत आहे.
व्यावसायिक पैसा वाचविण्याच्या नादात आपल्या दुकानात लहान बालके कामाला ठेवत आहे. कापड दुकानात गेल्यावर तर हमखास बालके दिसून येतात. हॉटेल, चहाटपऱ्या, कापड दुकान, किराणा दुकान, पाणीपुरी स्टॉल, थंडपेयाचे दुकाने यासह अनेक दुकानात बालमजूर काम करीत आहे. बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याच्या मोहिमेचा फज्जा शहरी भागासोबचत ग्रामीण भागातही फज्जा उडालेला आहे. बालमजुरी विषयी जनजागृती नाही. बालमजुरी रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनही आवश्यक प्रयत्न करीत नाही.
नोकरांना साप्ताहिक सुटीच नाही
नियमानुसार दुकानात काम करणाऱ्या नोकराना आठवड्यात एक दिवस साप्ताहिक सुट्टी आवश्यक आहे. ठरविलेल्या दिवशी दुकान बंद असणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकाने आठवड्याच्या सातही दिवस सुरु असतात. मुख्य बाजारपेठेत नेमके काही दुकानदार स्वत:ची काही दुकाने बंद ठेवतात. शहरातील इतर भागातील दुकाने कधीच बंद राहत नाही.

Web Title: Common use of child labor in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.