सर्व बोंडअळीग्रस्तांना भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:17 PM2018-03-15T23:17:32+5:302018-03-15T23:17:32+5:30

तालुक्यातील लोणबेहळ परिसरातील सर्वच गावे बोंडअळीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करून सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांना बोंडअळीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.

Compensate all the bollwearing victims | सर्व बोंडअळीग्रस्तांना भरपाई द्या

सर्व बोंडअळीग्रस्तांना भरपाई द्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : लोणबेहळ सर्कलमधील शेतकºयांची धडक

ऑनलाईन लोकमत
आर्णी : तालुक्यातील लोणबेहळ परिसरातील सर्वच गावे बोंडअळीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करून सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांना बोंडअळीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.
जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांच्या नेतृत्वात बुधवारी लोणबेहळ सर्कलमधील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. शेतकºयांसह परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. बोंडअळी सर्वेक्षणात मंडळातील सर्व गावे वगळण्यात आली. त्या सर्व गावांचा पुन्हा सर्वे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, ही प्रमुख मागणी यावेळी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.
गारपीट झाल्याने शेतकºयांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली नाही. यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून ही नोंद करण्यात यावी. यासोबतच लोणबेहळ येथील स्टेट बँक शाखा पूर्ववत लोणबेहळलाच सुरू करण्यात यावी, वनविभागाची जागा लोणबेहळ येथील जिल्हा परिषद शाळेला त्वरित हस्तांतरित करण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्राला भौतिक सुविधा पुरविण्यात याव्या, रेतीघाटामुळे रस्त्यांची होत असलेली दुरवस्था बघता खणीकर्म निधी देण्यात यावा, पारधी बेडा येथील पारधी समाजाच्या ताब्यातील जागा नियमानुकूल करून घरकुल देण्यात यावे, राणीधानोरा उपकेंद्राला निधी देण्यात यावा अशा विविध मागण्या जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, दिलीप चौहाण, विकास खडसे, उमेश आचनवार, सरपंच शरद भगत, योगेश तिवारी, सरपंच दिनेश ठाकरे, पिंटू चौधरी, अरुण टाके आदी उपस्थित होते.

Web Title: Compensate all the bollwearing victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.